लालू यादव – नितीन कुमार ‘एकत्र’ ? महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही BJP ‘डेंजर’ झोनमध्ये !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकारणात कोणीही कोणाचा दीर्घकाळ मित्र किंवा शत्रू असत नाही असं म्हणतात. महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून हे सिद्ध झाले आहे. आता त्याचीच पुनरावृत्ती बिहारमध्ये होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी बिहारमध्येदेखील ‘महाराष्ट्र फॉर्म्युला’ अमलात आणावा. जेडीयू, आरजेडी व अन्य राजकीय पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका आरजेडीचे उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह यांनी मांडली आहे.

रघुवंश प्रसाद सिंह म्हणाले की, “महाराष्ट्रातील राजकारणाचा साईड इफेक्ट बिहारच्या राजकारणावर होऊ शकतो. लवकरच बिहारमध्ये राजकीय भूकंप होईल. त्याचे कारण म्हणजे जेडीयू आणि आरजेडी यांच्यात सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू झाली आहे. तसेच जेडीयूला आमच्यासोबत येण्यास काही अडचण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये महाराष्ट्र फॉर्म्युला वापरल्यास भाजपविरोधातील राजकीय पक्षांना निश्चितच फायदा होईल.”

2015 मध्ये नितीश कुमार यांच्या लालू प्रसाद यादव यांच्यासोबत निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी सत्ता देखील स्थापन केली होती. मात्र नितीश कुमार यांनी 2017 मध्ये भाजपसोबत जात सरकार स्थापन केले. मात्र असे असले तरी भाजप व नितीश कुमार यांचे संबंध फारसे सलोख्याचे नाहीत. त्यामुळे रघुवंश प्रसाद सिंह यांच्या म्हणण्याप्रमाणे लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार भाजपविरोधात एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Visit : Policenama.com