ऑनलाइन नॉमिनेशन, मोजे घालून मतदान… अशी असणार यावेळची बिहार विधानसभेची निवडणूक

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने बिहार निवडणुकीसाठी एक गाइडलाइन जारी केली आहे. या गाइडलाइननुसार निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच कोरोना टाळण्यासाठी निवडणुकीत अनेक नियमांचे पालनही करावे लागतील.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने एक गाइडलाइन जारी केली आहे आणि सांगितले की यावेळी उमेदवार सिक्योरिटी मनी ऑनलाइन जमा करू शकतील. त्याचबरोबर, निवडणुकीत उमेदवार सिक्योरिटी मनी ऑनलाइन सबमिट करण्याची ही पहिली वेळ असेल. याशिवाय उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरावे लागतील.

त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या गाइडलाइननुसार जास्तीत जास्त पाच लोक डोर टू डोर प्रचार करण्यासाठी उमेदवारासमवेत जाऊ शकतात. गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार जाहीर सभा व रोड शो यांना परवानगी दिली जाईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने निवडणुकीदरम्यान कोरोनाचे संकट लक्षात घेऊन सावधगिरी बाळगण्याचेही म्हटले आहे. या गाइडलाइनमध्ये असे म्हटले आहे की निवडणूक प्रक्रियेदरम्यान फेस मास्क, सॅनिटायझर्स, थर्मल स्कॅनर, ग्लोव्हज, पीपीई किट वापरल्या जातील आणि सोशल डिस्टेंसिंगचे नियमही पाळले जातील.

हातमोजे दिले जातील

कोरोना वायरसचा धोका लक्षात घेऊन सर्व मतदारांना मतदार नोंदणीसाठी हातमोजे (ग्लव्स) दिले जातील. ईव्हीएम मशीनमध्ये मतदान करण्यापूर्वी मतदारांना ग्लोव्हज दिले जातील. याशिवाय मतदार ओळखण्याच्या प्रक्रियेदरम्यान मतदारांना गरज भासल्यास ओळख करून देण्यासाठी फेस मास्कदेखील काढावा लागेल.