CRPF च्या जवानांनी ठेवला सर्वांसमोर ‘आदर्श’, ‘प्रेग्नंन्ट’ महिलेला खांद्यावर घेऊन पोहचले हॉस्पिटलमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगढ येथील विजापूर मधील सीआरपीएफच्या जवानांनी एका नवीन आदर्श निर्माण केला केला आहे. जवानांनी सहा किलोमीटरचा रस्ता पार करून गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. हा परिसर असा आहे की,येथे कोणत्याही प्रकारची गाडी चालू शकत नाही. त्यामुळे जवानांनी महिलेला खांद्यावर उचलले आणि रुग्णवाहिकेपर्यंत पोहचवले. मिळालेल्या माहितीनुसार महिलेने दवाखान्यात मुलाला जन्म दिला असून आई आणि मुलं दोघेही सुखरूप आहेत.

अशा प्रकारे केली महिलेची मदत
मिळालेल्या माहितीनुसार, विजापूर येथे सीआरपीएफचे टीम पेट्रोलिंग करत होती. यावेळी जवानांना घनदाट जंगलामध्ये एक महिला मिळाली जी खूप आजारी होती आणि गरोदर होती. जवानांनी महिलेची मदत करण्याचा निश्चय केला आणि महिलेला खाटेच्या साहाय्याने खांद्यावर घेतले आणि रुग्णवाहिकेपर्यत पोहचवले. यानंतर महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोब्रा बटालियनच्या जवानांनी देखील केली मदत
कोब्रा बटालियन 204, 210, 241 बस्तरिया बटालियन आणि 168 बस्तरिया बटालियनची टीम गस्तीवर होती. गस्ती दरम्यान, त्याला बुडगीचेरू गावात एक जखमी तरुण आढळला. सैनिकांनाही त्याला खांद्यावर टाकून पाच किलोमीटर पायी चालत रुग्णालयात पोहचवले होते.

फेसबुक पेज लाईक करा – 

‘ब्लॅक कॉफी’ घेता ? वेळीच व्हा सावध ; रिसर्चमधील ‘हे’ 5 धक्कादायक खुलासे !

सतत वजन कमी-जास्त होणे आरोग्यासाठी घातक ! जाणून घ्या 3 तथ्य

थंडीत हृदयरोगाच्या रुग्णांनी ‘या’ 4 गोष्टींची घ्यावी खास काळजी !

नारळ पाण्याने वेगाने वजन होईल कमी ! जाणून घ्या 11 फायदे

‘युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन’ झाल्यास ‘या’ 5 गोष्टींची घ्या काळजी !