सब इन्स्पेक्टर दीपक भारद्वाज यांची चित्तथरारक कहाणी, नक्षलवाद्यांच्या तावडीतून साथीदारांना वाचवल अन् गाणं गुणगुणत झाले शहीद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 22 जवान शहीद झाले. यात शहीद झालेल्यामध्ये समावेश असलेल्या सब इन्स्पेक्टर दीपक भारद्वाज याने यापूर्वी देखील अनेकदा नक्षलवाद्याचा खात्मा केला आहे. त्यांच्या सहकारी जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, दबावाच्या क्षणी गाण गुणगुणण्याची भारद्वाज यांची सवय होती. शनिवारी देखील भारद्वाज यांच्या पथकाला नक्षलवाद्यांनी घेरून गोळीबार सुरु केला. यात अनेक जवान जखमी झाले. पण भारद्वाज यांनी प्रसंगावधान बाळगून आपल्या अनुभवाचा वापर करत साथीदार जवानांचा घेरा करुन नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर दिले.

आपल्या सहकारी जवानांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी ते देशभक्तीपर गाणं गुणगुणत होते. याच दरम्यान आयईडी बॉम्बचा स्फोट झाला आणि त्यांना प्राण गमावावे लागले. जांजगीर जिल्ह्याच्या पिहरीद येथील रहिवाशी असलेले भारद्वाज यांचा जन्म 1990 मध्ये झाला होता. त्यांना लहानपणापासून बास्केटबॉल आणि गाण्याचा छंद होता. 2013 मध्ये ते छत्तीसगडमध्ये पोलीस दलात भरती झाले होते. अवघ्या दीड वर्षापूर्वी म्हणजेच 2019 मध्ये त्यांचे लग्न झाले होते.

दीपक यांच्याशी होळीपूर्वी शेवटचे बोलण झाल्याची माहिती त्यांचे वडील राधेलाल भारद्वाज यांनी दिली. शनिवारी जेव्हा नक्षलवाद्यांचा हल्ला झाल्याचे समजले. त्यावेळी राधेलाल देखील बिजापूर येथे रवाना झाले. त्यांनी हल्ल्यानंतर आपल्या मुलाचा शोध घेतला. बराच शोध घेतल्यानंतर बिजापूरच्या जीवनागुडा परिसरात त्यांचा मृतदेह आढळला. भारद्वाज यांनी इयत्ता सहावी ते 12 पर्य़ंतचे शिक्षण नवोदय विद्यालय मल्हार येथून पूर्ण केले होते. ते एक चांगले बास्केटबॉल खेळाडू होते.