‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे आणि हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज (25 जानेवारी) सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले. हिवरेबाजार हे गाव प्रसिद्ध होण्यामागे मोलाचा सहभाग असलेल्या पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. याचसह महाराष्ट्रात चर्चेत आलेल्या बीजमाता राहीबाई पोपेरे यांना देखील पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाली आहे.

पोपटराव पवार आणि राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री जाहीर झाल्याने महाराष्ट्राच्या पेचात आणखी दोन मानाचे तुरे खोवले गेले. आज ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. या तिघांना पद्मश्री देऊन गौरवण्यात येणार आहे.

राहीबाई पोपेरे यांना बीजमाता म्हणून ओळखले जाते. देशी बियाणांचे जतन करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांचा सन्मान होणार आहे. तर पोपटराव पवार यांनी आपले दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेले गाव हिवरेबाजार दुष्काळमुक्त केले. हिवरेबाजार या गावचे माजी सरपंच असलेल्या पोपटराव पवार यांनी त्यांच्या दुष्काळी गावाचा कायापालट केला. याच कारणाने त्यांना सरकारकडून गौरवण्यात येणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –