प्रियांका गांधीचा सरकारवर शायरी अंदाजात हल्ला, म्हणाल्या – ‘जो गन्ने की कीमत दे न सका वो जान की कीमत क्या जाने’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी सोमवारी शेतकरी आणि उसाच्या थकबाकी भरण्या संदर्भात राज्य सरकारचे भाजपा सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. बिजनौर चांदपूर येथील किसान महासभेला संबोधित करताना प्रियंका गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ला फिरण्यासाठी 2 विमानं 16 हजार कोटी रुपयात खरेदी केेली. 16 हजार कोटी रूपयांत प्रत्येक शेतकऱ्याचे उसाचे थकीत रुपये दिले गेले असते. ते म्हणाले की, पंतप्रधानांकडे फिरायला पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना देेण्यासाठी नाही. प्रियांका गांधी म्हणाल्या की, कृषी कायद्याच्या माध्यमातून भांडवलदार एकत्रित होतील आणि शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतही मिळणार नाही.

किसान महासभेला संबोधित करतांना प्रियंका म्हणाल्या, “मी येथे भाषण देण्यासाठी आले नाही. मी तुमच्याशी बोलण्यासाठी आले आहे. कधीकधी मला आश्चर्य वाटते की जनतेने नरेंद्र मोदी यांना दोनदा का निवडून दिले? कदाचित असा विश्वास असेल की अशी धोरणे आणतील की, विकास होइल, पण असे काही झाले नाही. त्यांनी उसाला किंमत वाढवली आहे का? त्यांनी भाव वाढविला नाही. उसाचा थकीत हप्ता मिळाला नाही. त्यांच्याकडे शेतकर्‍यांना देण्यासाठी पैसे नाहीत. जो विश्वास होता, तो तुटला आहे. ”

शेतकऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना प्रियंकाने शेर देखील म्हंटला, ‘भगवान का सौदा करता है, इंसान की कीमत क्या जाने? जो गन्ने की कीमत दे न सका वो जान की कीमत क्या जाने?’

कृषी कायदा आणि ऊस देयकाचा संदर्भ
प्रियंका गांधी यांनी आपल्या संबोधनात वारंवार कृषी कायदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उल्लेख केला. शेतकरी चळवळीवर त्यांनी विचारले, कोणाची भलाई जबरदस्तीने केली जाते का? तुमची समज कोट्यावधी शेतकऱ्यांपेक्षा जास्त आहे का?

कृषी कायद्या संंदर्भात पंतप्रधानांवर निशाणा साधत प्रियंका गांधी म्हणाल्या की, कृषी कायद्यामुळे होल्डिंग वाढतील. किमान समर्थन किंमत उपलब्ध होणे थांबेल. आपण कोर्टामध्येही जाऊ शकणार नाही. असा कायदा करण्यात आला आहे की कोणताही कायदा लागू होणार नाही. हा देश आंधळा नाही. प्रत्येक देशवासीय पहात आहे. पंतप्रधानांनी देश आपल्या भांडवलशाही मित्रांच्या ताब्यात दिला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की असे सरकार तुमच्यासाठी काय करेल ? पंतप्रधान अमेरिकेत जाऊ शकतात, चीनला जाऊ शकतात, परंतु त्यांच्या घरापासून 2 किलोमीटर दूर जाऊ शकत नाहीत. “