आजोबांच्या पुण्यातिथीसाठी आलेल्या नातवाचा अपघातात मृत्यू

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – आजोबांच्या पुण्यतिथीसाठी गावी आलेल्या एका नातवाचा आज (शनिवार) अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल सुखदेव भेंडारकर (वय-23) असे मृत्यू झालेल्या नातवाचे नाव आहे. राहुल गुजरातमध्ये कामाला असून आजोबाच्या पुण्यातिथीसाठी तो आपल्या गावी लाखांदूर तालुक्यातील साखरा या गावी आला होता.

राहुल शनिवारी आजोबांच्या पुण्यतिसाठी साखरा या गावी जात होता. त्यावेळी त्याच्या दुचाकीला भरधाव वेगात जाणाऱ्या कारची धडक बसली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. राहुल हा ट्रेनने गुजरातवरून नागपूर येथे आला होता. भावाची दुचाकी घेऊन तो साखरा या आपल्या गावी जात होता. साकोली ते लाखांदूर मार्गावर शिवनीबांध या रस्त्यावर सानगडी वरून साकोली कडे जाणाऱ्या इंडिका कारने राहुलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघात जोरदार धडक बसल्याने राहुलचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मुळताच त्याच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. आजोबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या नातवाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरु आहे. नागपूरहून निघण्याच्या आधी राहुलने आपल्या कुटुंबाशी फोनवरुन बोलला होता. काही तासांमध्ये मी येतो असे त्याने आईशी बोलताना सांगितले. आपल्या मुलाची प्रतिक्षा करत असलेल्या आईला त्याच्या मृत्यूची बातमी ऐकावी लागल्याने त्यांना मानसिक धक्का बसला आहे.

Visit : Policenama.com