दुचाकी सॅनिटाइज करत होता कर्मचारी, अचानक लागली आग

गुजरात : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभर स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. लोकांना त्यांच्या घरात वापरले जाणारे प्रत्येक सामान आणि वाहन स्वच्छ करण्याचे आवाहन केले जात आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथे दुचाकी सॅनिटाइज करताना जे घडले ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

अहमदाबादमधील एका खासगी कंपनीच्या गेटवर कर्मचार्‍यांच्या गाड्यांना सॅनिटाइज केल्यावरच आत प्रवेश दिला जात होता. याच दरम्यान जेव्हा एक कर्मचारी आपली बाईक सॅनिटाइज करत होता, तेव्हा बाईकला अचानक आग लागली. बाईकला आग लागताच कर्मचार्‍यांना काही समजले नाही.

तो लगेच बाईक सोडून तेथून पळून गेला, तर तेथे उपस्थित असलेल्या गार्डसनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझली नाही तर गार्डने धावत जाऊन अग्निशामक यंत्र आणले. त्यानंतर तिथे उपस्थित लोकांनी कसेबसे आगीवर नियंत्रण मिळवले, पण तोपर्यंत बाईक जळून खाक झाली. असे सांगितले जात आहे की, बाईक चालू असल्याने आणि सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असल्यामुळे बाईकला आग लागली असेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like