मौज मजेसाठी सायकली चोरणारा गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – चैनीसाठी आणि मौज मजेसाठी महागड्या सायकली चोरणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट २ ने डांगे चौकात केली. पकडण्यात आलेल्या गुन्हेगाराकडून १ लाख ४८ हजार ५०० रुपयांच्या १३ सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

विवेक वाल्मीक गायकवाड (वय-१८ रा. जोशी चाळ, मातोश्री हॉस्पीटल मागे, गुजरनगर, थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. महागड्या सायकलींची विक्री करण्यासाठी एक तरुण डांगे चौकात आला असल्याची माहिती युनिट २ चे पोलीस नाईक गैस नदाफ यांना समजली. पथकाने डांगे चौकात सपाळा रचून विवेक गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेली काळ्या रंगाची सायकल विषयी चौकशी केली.

चौकशी दरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला युनिट -२ च्या कार्यालयात आणून सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने चैनीसाठी आणि मौज मजेसाठी महागड्या सायकली चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे पोलीस कर्मचारी संजय गवारे, हजरत पठाण, गौस नदाफ, संदीप ठाकरे, मयुर वाडकर, जमीर तांबोळी, फारुख मुल्ला, चेतन मुंढे, नारायण जाधव, प्रविण दळे, लक्ष्मण आढारी यांच्या पथकाने केला.

You might also like