मृत दुचाकीस्वाराच्या कुटुंबाला मिळणार ८७ लाख रुपये नुकसान भरपाई

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन: तीन वर्षांपूर्वी  ट्रक अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ८७ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश ठाण्यातील मोटार अपघात दाव्याची सुनावणी करणाऱ्या लवादाने दिले आहेत. मदन भगत असं मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ साली ट्रक अपघातात ते  मरण पावले होते.
मदन भगत हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या काली निधनामुळे आयुष्य अंधकारमय झाले आहे असं सांगत अपघातात मरण पावलेल्या मदन भगत यांच्या कुटुंबाने लवादामध्ये याचिका दाखल केली आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
मदन भगत हे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी ट्रान्समिशन कंपनीमध्ये नोकरीला होते. त्यांना महिना ४५ हजार रुपये वेतन होते. अर्ज करणारे सर्व कायदेशीर वारस असून ते मदत भगत यांच्यावर अवलंबून होते. अशी माहिती कुटुंबाच्यावतीने युक्तीवाद करणाऱ्या वकीलांनी लवादाला दिली.
कसा झाला अपघात ?
५ ऑगस्ट २०१५ रोजी मदन भगत हे दुचाकीवरुन मुंब्रा बायपास ब्रिजवरुन रेतीबंदर रोडवरुन ठाण्याच्या दिशेने येत असताना भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रकने मदन यांची दुचाकी आणि अन्य तीन गाडयांना धडक दिली. मदन आणि अन्य एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. अन्य चार जण जखमी झाले. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले.
लवादाने दिले हे निर्देश 
महत्त्वाचे म्हणजे या खटल्याच्या सुनावणीला ट्रक मालक हजर राहिला नसल्याने  विमा कंपनीने हा खटला लढवला. इतकेच नाही तर अपघाताच्यावेळी ट्रककडे फिटनेस प्रमाणपत्र नव्हते. त्यामुळे पैसे देण्याची आमची जबाबदारी नाही अशी विमा कंपनीची भूमिका होती. तरी  याचिकाकर्त्याला पैसे द्यावे लागतील ते तुम्ही ट्रक मालकाकडून वसूल करा असा निकाल लवादाने दिला. मृताच्या नातेवाईकांना वार्षिक ७.५ टक्के व्याजदराने रक्कमेचे वितरण करा असे निर्देश लवादाने दिले
Loading...
You might also like