खुशखबर ! फक्त 9 रुपयात ‘बुक’ करा विमानाचे ‘तिकिट’, करा परदेशात प्रवास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कमी बजेटमध्ये परदेशात फिरायला जाणाऱ्यासाठी ही अतंत्य महत्वाची बातमी आहे. वियतनामची लो कॉस्ट एअरलाइन वियतजेटने बंपर ऑफर दिली आहे. वियतजेट फक्त 9 रुपयात वियतनामचे विमान तिकिट देत आहे. ‘वियतजेट’कडून भारत आणि वियतनाम दरम्यान थेट विमान प्रवास सेवा सुरु करण्यात येणार आहे. यामुळे वियतनाम जाणाऱ्यासाठी अगदी स्वस्त प्रवासाचा ऑफर असणार आहे.

वियतजेट एअरलाइनने गोल्डन डेज ऑफर सुरु केली आहे. जी 20 ऑगस्ट पासून सुरु होणार असून 22 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. वियतजेट नवी दिल्लीपासून चीन मिन सिटी आणि हनोईच्या नव्या मार्गावरुन नॉनस्टॉप विमान सेवा सुरु करणार आहे. या ऑफर अंतर्गत 9 रुपयांच्या बेस फेअर विमान तिकिट असणार आहे. या फेअरमध्ये एअरपोर्ट शुल्क आणि इतर उपकरांच्या समावेश करण्यात आलेला नाही.

असे बुक करा तिकिट –
ग्राहक www.vietjetair.com या वेबसाइटवर जाऊन तिकिट बुक करु शकतात. याशिवाय वियतजेट एअर मोबाइल अ‍ॅप द्वारे 6 डिसेंबर 2019 ते 25 मार्च 2020 पर्यंतचे तिकिट बूक करु शकतात.

हे असणार विमानचा वेळापत्रक –
नवी दिल्लीवरुन 6 डिसेंबर 2019 पासून दर आठवड्याच्या सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार चार रिटर्न फ्लाइट्स हो ची मिन सिटी जाईल, तर हनोईपासून नवी दिल्ली मार्गावर 7 डिसेंबर 2019 पासून दर आठवड्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी प्रवास करतील.

विमानाचे वेग –
हो चिन मिन सिटीपासून फ्लाइट 7 वाजता संध्याकाळी उड्डाण करेल आणि रात्री 10.50 मिनिटांना दिल्लीला पोहचेल. नवी दिल्लीहून रिटर्न फ्लाइट रात्री 11.50 मिनिटांनी उड्डाण करेल आणि सकाळी 6.10 मिनिटांना चिन मिन सिटी पोहचेल.

आरोग्यविषयक वृत्त –