बिकीनी फोटोमुळं प्रचंड ट्रोल झाली अभिनेत्री ‘रूबीना’ ! ट्रोलर्स दिलं ‘सडेतोड’ उत्तर

पोलीसनामा ऑनलाईन :टीव्हीमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री रुबीना दिलैक (Rubina Dilaik). रुबीनाला तिच्या हॉटनेस आणि बिकीनी अवतारासाठी ओळखलं जातं. ती नेहमीच फोटो शेअर बिकीनी बॉडी फ्लाँट करताना दिसत असते.

सध्या रूबीना आपल्या घरातच वेळ घालवत आहे. एका मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की, ती ट्रोलर्सचा सामना कसा करते. यावर तिनं भाष्य केलं आहे.

रुबीना म्हणाली, “मी माझ्या कमेंट चेक करत बसत नाही. माझ्यासाठी बिकीनी म्हणजे एक क्षण आहे. मी कोणत्याही संतुष्टीसाठी हे करत नाहीये हेच मला मित्रांना आणि चाहत्यांना सांगायचं आहे. याचा अर्थ असा नाही मला काही फरक पडत नाही. अभिनवनं क्लिक केलेल्या माझ्या बिकीनी फोटोवरील कमेंट पाहून तर मी विचार केला अरे देवा हे काय आहे.”

पुढे बोलताना रुबीना म्हणते, “ही माझी पर्सनॅलिटी आहे, बॉडी आहे आणि माझी चॉईस आहे. एक तर तुन्ही कमेंट करणाऱ्या ट्रोलर्सच्या तोंडाला तोंड देऊन त्यांच्या लेवल जा किंवा मग अशा ट्रोलर्सला इग्नोर करा. मी इगनोर करणं शिकले आहे.”

रुबीनाबद्दल सांगायंच झालं तर टीव्ही सोबतच रुबीना सोशल मीडीयावरही खूप फेमस आहे. तिला पतीसोबत फिरायला खूप आवडतं. तिचे अनेक व्हिडीओ ब्लॉग देखील आहेत.

रुबीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर सध्या ती शक्ति अस्तित्व के अहसास की या मालिकेत काम करत आहे. यामध्ये ती किन्नरच्या भूमिकेत आहे. चाहत्यांची तिच्या कामाली मोठी पसंती मिळताना दिसत आहे.