अभिनेत्री अहानानं बिकीनीमध्येच ‘निशाणा’, फोटोंनी लावली पाण्यात ‘आग’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झालेल्या सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटांपैकी एक मानला जातो. स्वतःच्या लैंगिक भावनांना मुक्तपणे बाहेर येण्यासाठी वाट मोकळी करून देणाऱ्या महिलांची कथा दाखवणाऱ्या या चित्रपटाचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे बॉलिवूड अभिनेत्री अहाना कुमरा विशेष चर्चेत आली होती. त्याचबरोबर ही अभिनेत्री आपल्या सेक्सी आणि बोल्ड फोटोमुळे देखील चर्चेत येत असते.

बॉलिवूड अभिनेत्री अहाना कुमरा सध्या चित्रपटसृष्टीतून जरी गायब असली तरी आपल्या फोटोंमुळे ती नेहमी चाहत्यांच्या नजरेत येत असते. तिचे सेक्सी फोटो चाहत्यांना घायाळ करत असतात. अहाना नेहमी तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे बिकीनीवरील फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो चाहत्यांना खूप पसंत पडत असतात. तिच्या फोटोंना चाहते लाइक आणि कमेंट करत असतात.

अहाना सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिचे इन्स्टाग्राम अकाउंट 7 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अहानाने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये तिने वेगवेगळ्या रंगाची बिकीनी घातली आहे. त्याचबरोबर प्रत्येक फोटोमध्ये तिने वेगवगळी पोज दिली आहे. तिचा प्रत्येक फोटोमधला सेक्सी आणि बोल्ड लुक चाहत्यांना पहायला मिळतो.

अहानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर तिने आत्तापर्यंत ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’, ‘शमशेरा’, ‘फ्रॉड सैंय्या’ ‘परीक्षा’, ‘सांड की आंख’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांमधील तिचा अभिनय रसिकांना जरी फारसा भावला नसला तरी तिच्या फोटोने मात्र चाहत्यांना वेडे केले आहे. तुम्ही तिच्या इन्टाग्राम अकाउंटवर तिचे सेक्सी फोटो पाहू शकता.

 

फेसबुक पेज लाईक करा –