‘झलक दिखला जा’ आणि ‘बिग बॉस’मधील सौफी चौधरीचं ‘कडक’ फोटोशूट चर्चेत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘झलक दिखला जा’ आणि ‘बिग बॉस’ डान्सिंग रियॅलिटी शोमध्ये दिसणारी अभिनेत्री सोफी चौधरी आपल्या हॉट अवतारमुळे चर्चेत आहे. तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावरील वातावरण बर्‍याचदा गरम असते. यावेळीही सोफी चौधरीने सगळ्यांना घायाळ करण्यासाठी काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये आपल्या बॉडीला फ्लॉन्ट करुन इंटरनेटवर खळबळ उडविली आहे.

‘प्यार के साइड इफेक्ट’ या बॉलिवूड चित्रपटात दिसलेल्या सोफीने हे फोटो नुकतेच शेअर केले आहे. या फोटोत सोफी खूपच बोल्ड दिसत आहे. बॉलिवूड चित्रपटपासून ते टीव्ही शो मध्ये काम करणार्‍या सोफीचे हे फोटो खूपच चर्चेमध्ये आहे. सोफी सोशल मिडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमी तिचे अनेक सेक्सी फोटो शेअर करत असते.

अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून प्रसिद्ध असलेली सोफी एक गायिका आहे. तिने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे तसेच अनेक गाण्यांसाठी प्लेबॅक सिंगिग केले आहे. ३५ वर्षाच्या सोफीने ‘आ देखें जरा’ या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे.

बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री सोफीने लंडन ऑफ इकॉनॉमिक्स स्कूलमधून युरोपियन पॉलिटिक्स पदवी प्राप्त केली आहे. सोफीच्या सुरुवातीच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे म्हणले तर तिने २००२ मध्ये एमटीव्हीमध्ये होस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली. तिच्या कारकीर्दीची सुरूवात झाल्यानंतर काही दिवसातच तिचा व्हिडिओ अल्बम चांगलाच गाजला. इथूनच, तिच्या आयुष्याला नवीन वळण लागले.

 

आरोग्यविषयक वृत्त