जगातील सर्वात श्रीमंत जोडपे झाले ‘विभक्त’ ! बिल गेट्स आणि मेलिंडा यांच्याकडून विवाहाच्या 27 वर्षानंतर घटस्फोटाची घोषणा

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी विवाहाच्या 27 वर्षानंतर घटस्फोटाची घोषणा केली आहे. मेलिंडा आणि बिल गेट्स यांनी यासंबंधी एक संयुक्त वक्तव्य जारी केले आहे.

वक्तव्यात म्हटले आहे की, मोठी चर्चा आणि आपल्या नात्यावर काम केल्यानंतर आम्ही आमचा विवाह संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 27 वर्षात आम्ही तीन मुलांचे संगोपन करून त्यांना मोठे केले. आम्ही एक फाऊंडेशन सुद्धा बनवले आहे जे जगभरात लोकांचे आरोग्य आणि चांगल्या जीवनासाठी काम करत आहे. आम्ही या मिशनसाठी अजूनही समान विचार ठेवू आणि सोबत काम करू. मात्र, आम्हाला आता वाटते की, आम्ही जीवनातील आगामी काळात पती-पत्नी म्हणून सोबत राहू शकणार नाही. आम्ही नवीन जीवन सुरू करत आहोत. अशावेळी लोकांकडून आमच्या कुटुंबासाठी स्पेस आणि प्रायव्हसीची अपेक्षा आहे.

27 वर्षांपूवी केला होता विवाह
बिल बिल गेट्स आणि मेलिंडा यांची भेट 1987 मध्ये न्यूयॉर्कमध्ये एक्सपो-ट्रेड मेळाव्यात झाली होती. येथेच दोघांमध्ये चर्चा सुरू झाली होती. मायक्रोसॉफ्ट कार पार्किंगमध्ये बिल गेट्स यांनी त्यांना बाहेर फिरायला जाण्याबाबत विचारले होते. बिल यांनी विचारले होते की ‘आतापासून दोन आठवडे, तु फ्री आहेस का?‘परंतु मेलिंडाने त्यांचे प्रपोजल धुडकावले होते आणि म्हटले होते ‘वेळ आल्यानंतर मला हा प्रश्न विचार‘.

ज्यानंतर सुद्धा बिल गेट्स यांनी हार मानली नाही. हळुहळु दोघांचे बोलणे वाढले. काही महिन्यानंतर, दोघांनी खरोखर नाते यशस्वी केले. 1993 मध्ये त्यांनी साखरपुडा केला आणि नव्या वर्षाच्या दिवशी 1994 मध्ये दोघांनी लग्न केले.