Love Story : जेव्हा बिल गेट्स म्हणाले – ’माझ्याकडे मायक्रोसॉफ्ट होते, मेलिंडाचे होते अनेक Boyfriends’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी लग्नाच्या 27 वर्षानंतर घटस्फोट घेतला आहे. दोघांनी एक सामायिक वक्तव्य जारी करून आपला विवाह संपुष्टात आणल्याची घोषणा केली आहे. 27 वर्षांचा मोठा काळ एकत्र घालवल्यानंतर अचानक वयाच्या या टप्प्यावर घटस्फोटाच्या या वृत्ताने अनेक लोक हैराण झाले आहेत. बिल गेट्स आणि मेलिंडाची लव्ह स्टोरी ते घटस्फोटापर्यंतची पूर्ण कथा जाणून घेवूयात…

2019 मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली ’इनसाईड बिल्स ब्रेन’ सीरीजमध्ये बिल गेट्स यांच्या वैयक्तिक जीवनाबाबत खुप काही दाखवण्यात आले आहे. डॉक्यूमेंट्रीनुसार, मेलिंडाने 1987 मध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून मायक्रोसॉफ्ट जॉईन केले होते. एका बिझनेस डिनरदरम्यान पहिल्यांदा बिल यांची भेट मेलिंडासोबत झाली आणि हळुहळु दोघांमध्ये जवळीक वाढली.

सुरुवातीला बिल आणि मेलिंडा आपल्या नात्याबाबत गंभीर नव्हते. डॉक्यूमेंट्रीमध्ये एका ठिकाणी बिल म्हणतात, तिचे आणखीही बॉयफ्रेंड होते आणि माझ्याकडे मायक्रोसॉफ्ट होते. आम्ही दोघे एकमेकांबाबत गंभीर नव्हतो आणि एकमेकांसोबत वेळ घलवण्याची मागणीही करत नव्हतो. मात्र, एक वर्षाच्या डेटिंगनंतर कथा बदलली.

एक दिवस बिलने अचानक मेलिंडाला ’आय लव्ह यू’ म्हटले. मेलिंडाने सुद्धा बिलकडे आपले प्रेम व्यक्त केले. बिलने म्हटले, ’आम्ही एकमेकांची खुप काळजी करत होतो आणि आमच्याकडे केवळ दोन शक्यता होत्या, एकतर ब्रेकअप करायचे किंवा लग्न.’ डॉक्यूमेंट्रीमध्ये मेलिंडा हसत सांगितले की, त्यांना एक निर्णय घ्यायचाच होता. एक दिवस मी बिलच्या खोलीत गेले, जिथे ते आपल्या व्हाईट बोर्डवर एक लिस्ट बनवत होते की, लग्न करण्याचे कोणते फायदे आणि तोटे आहेत.

मेलिंडा म्हणाली, बिलला लग्न तर करायचे होते परंतु ते यामुळे द्विधा मनस्थितीत होते की, मायक्रोसॉफ्ट चालवण्यासह ते हे सुद्धा निभावू शकतील का. बिल यांचे म्हणणे होते की, त्यांनी लग्नाच्या विचारांना खुप गांभिर्याने घेतले होते. अखेर 1994 मध्ये दोघांनी विवाह केला. त्यावेळी बिल यांचे वय 38 आणि मेलिंडाचे वय 29 वर्ष होते.

दोघांना तीन मुले आहेत. 1996 मध्ये मेलिंडाने आपली पहिली मुलगी जेनिफरला जन्म दिला. यानंतर 1999 मध्ये मुलगा रोरी आणि 2002 मध्ये दुसरी मुलगी फोएबे ची आई बनली. मुलांना जन्म दिल्याच्या 9 वर्षानंतर मेलिंडाने मायक्रोसॉफ्ट सोडले, मात्र ती कामात पतीला मदत करत होती.

1994 मध्ये दोघांनी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनची सुरुवात केली. हे फाऊंडेशन जागतिक आरोग्य, शिक्षण आणि विकासाच्या मुद्द्यावर काम करते. 2019 मध्ये एका फेसबुक लाइव्ह दरम्यान बिल यांनी म्हटले होते की, सोबत काम करताना एकाचवेळी कुटुंब सांभाळणे आव्हानात्मक काम आहे. आम्ही खुप भाग्यशाली आहोत कारण अनेक गोष्टी एकाच दृष्टीकोनातून पहातो, आमच्या दोघांची लक्ष्य खुपच जास्त समान आहेत.

डॉक्यूमेंट्रीमध्ये बिल यांनी मेलिंडाचे कौतूक करताना त्यांना सच्चा सोबती म्हटले होते. बिल यांनी म्हटले होते की, मेलिंडा एक सकारात्मक दृष्टिकोण ठेवते आणि माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने लोकांना भेटते. ती माझ्यापेक्षा चांगली माणूस आहे.

बिल आणि मेलिंडा यांची मोठी मुलगी जेनिफर स्टॅनफोर्डमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत आहे. जेनिफरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक वक्तव्य जारी केले आहे, ज्यात तिने आई-वडीलांच्या विभक्त होण्याबाबत लिहिले आहे.

पोस्टमध्ये जेनिफरने लिहिले. हा आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक आव्हानात्मक काळ आहे. मी अजूनही शिकत आहे की, या काळात स्वताला सांभाळण्यासह कुटुंबातील अन्य लोकांकडे लक्ष कसे ठेवू. मला दोघांच्या विभक्त होण्यावर कोणतीही वैयक्तिक टिप्पणी करायची नाही. तुमचे समर्थन आणि सहकार्यासाठी धन्यवाद.