…म्हणून मोनिका लेविंस्कीसोबत संबंध ठेवले, माजी राष्ट्रपती बील क्लिंटन यांचा ‘खुलासा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी अखेर कबूल केले की त्यांनी मोनिका लेविंस्की सोबत शारीरिक संबंध ठेवले होते. यामागचे कारण त्यांनी देखील सांगितले. याची कबुली त्यांनी पत्नी हिलरी क्लिंटन यांच्यावरील हुलू नामक माध्यमसंस्थेची डाक्युमेंट्री ‘हिलरी’ मध्ये दिली. या डाक्युमेंट्रीत हिलरी क्लिंटनच्या संपूर्ण जीवनाची कहाणी दाखवण्यात आली आहे.

बिल क्लिंटन यांनी सांगितले की ज्यावेळी ते मोनिका लेविंस्कीला भेटले, त्यावेळी ते कामाच्या तणावात होते. त्यातून हे शारीरिक संबंध घडले. या डाक्युमेंट्री मध्ये त्यांनी मोनिका लेविंस्कीची माफी देखील मागितली. तसेच त्यांनी हे देखील मान्य केले की मोनिका बरोबरच्या त्यांच्या संबंधांमुळे त्यांचे जीवन नरक बनले होते. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, जेव्हा आपल्याला सामान्य जीवन जगायचे असते आणि आपल्यावर कामाची जबाबदारी अधिक असते, तेव्हा अशा चुका घडतात.

पुढे बिल क्लिंटन म्हणाले की १९९८ मध्ये मोनिका लेविंस्की प्रकरणानंतर त्यांच्या जीवनात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. बिल आणि हिलरी हे सार्वजनिक ठिकाणी फार कमी दिसत होते. २०१८ मध्ये हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले होते. तेव्हा बिल क्लिंटन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की मोनिका लेविंस्कीची खाजगीत माफी मागण्याची त्यांना गरज वाटत नाही.

तसेच बिल क्लिंटन यांनी त्यांची पत्नी हिलरी क्लिंटन यांची प्रशंसा करत स्पष्ट केले की त्यांना सर्व काही माहित असूनही त्या वाईट काळात त्यांच्याबरोबर नेहमी उभ्या राहिल्या. या कारणामुळे त्यांचे वैयक्तिक जीवन खूप असंतुलित झाले होते.

हिलरी क्लिंटन यांनी या डॉक्युमेंट्रीत सांगितले की, जेव्हा त्यांच्या पतीने त्यांना घडलेली घटना सांगितली तेव्हा त्या पूर्णपणे थक्क झाल्या होत्या. त्यांना या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की बिल हे खरं बोलत आहेत. हिलरी म्हणाल्या की जेव्हा घडलेली सत्य घटना बिल यांनी न लपवता सांगितली तेव्हा त्यांच्यासोबत उभे राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

सर्वात वाईट परिस्थिती तेव्हा उद्भवली जेव्हा हिलरीसमोर बिल ने मोनिका सोबत असणाऱ्या आपल्या संबंधांविषयी मुलगी चेलसीला सांगितले. तेव्हा मुलीने बिल यांच्यावर प्रश्नांची मालिका उभी केली होती. तसेच ती कित्येक महिन्यांपर्यंत बिल यांच्यावर नाराज होती.