Bill Gates | बिल गेट्स यांनी महिला कर्मचार्‍याला ‘डेट’वर येण्यासाठी पाठवला होता मेल

Advt.

वॉशिंग्टन : Bill Gates | मायक्रोसाफ्टच्या (Microsoft) प्रवक्त्याने सांगितले की, गेट्स (Bill Gates) यांनी महिला कर्मचार्‍यास ईमेल पाठवले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कंपनीच्या अधिकार्‍यांनी गेट्स यांना म्हटले होते की त्यांचे वर्तन अयोग्य आहे. अधिकार्‍यांनी कंपनी बोर्डच्या काही सदस्यांना सुद्धा याबाबत माहिती दिली होती.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्ट (Microsoft) चे चेयरमन बिल गेट्स (Bill Gates) यांनी 2008 मध्ये कंपनीच्या एका महिला कर्मचार्‍याला ईमेल पाठवून डेटवर येण्यासाठी विचारणा केली होती. या मेल बाबत समजल्यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी गेट्स यांना ताकीद दिली होती. सोमवारी मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.

प्रवक्त्याने म्हटले की, अधिकार्‍याच्या इशार्‍यात त्या मेसेजचा सुद्धा समावेश होता ज्यामध्ये गेट्स यांनी महिला कर्मचार्‍याला डेटवर येण्यास विचारले होते.
त्यावेळी गेट्स कंपनीत पूर्णवेळ कर्मचारी आणि कंपनीचे चेअरमन होते. ईमेलमध्ये त्यांनी महिला कर्मचार्‍याला कंपनीच्या बाहेर भेटण्यास सांगितले होते.

प्रवक्त्याने म्हटले की, गेट्स (Bill Gates) यांनी बोर्ड सदस्यांच्या समोर मान्य केले होते की त्यांनी जे काही केले ते आयोग्य होते.
यानंतर बोर्डाने गेट्स यांच्याविरूद्ध कोणतीही कारवाई केली नव्हती.

उल्लेखनीय म्हणजे याचवर्षी ऑगस्टमध्ये बिल गेट्स आणि मेलिंडा फ्रेंच गेट्स यांच्यात औपचारिक प्रकारे घटस्फोट झाला.
27 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर दोघांनी तीन मे रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.

बिल आणि मेलिंडा गेट्स जगातील सर्वात मोठ्या खासगी समजासेवी ट्रस्टपैकी एक बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सह संस्थापक सुद्धा आहेत.
सिएटल येथील एका फाउंडेशनने मागील दोन दशकांत जागतिक आरोग्य आणि कल्याणकारी कार्यावर साडेतीन लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.

या फाऊंडेशनने मलेरिया आणि पोलिओ निर्मुलनासाठी चालवल्या जाणार्‍या कार्यक्रमांसाठी मदत पुरवली.
मागील वर्षी कोरोना महामारी समोर आल्यानंतर यास तोंड देण्यासाठी सुद्धा बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने 1.75 अरब डालर (सुमारे 13 हजार कोटी रुपये) दिले होते.

हे देखील वाचा

Beed Crime | ‘रंगेल’ पतीला प्रेयसीसोबत ‘गुपचूप’ ज्यूसचा ‘कार्यक्रम’ करताना पत्नीनं पाहिलं, दोघांना धो-धो धुतलं

Nagpur Crime | नागपुर जिल्ह्यातील संतापजनक घटना ! 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Bill Gates | bill gates send mails to female colleague for date news in marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update