‘बिल गेट्स’च्या ‘मुली’चा मिस्त्रच्या मुस्लिम तरुणाशी ‘साखरपुडा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणल्या जाणाऱ्या बिल गेट्स यांच्या मुलीने जेनिफर गेट्सने आपल्या प्रियकरासोबत (नायेल नसाल) साखरपुडा केला आहे. जेनिफरने ही माहिती तिच्या इंस्टाग्राम हॅडेलवर दिली.

23 वर्षीय जेनिफरला 28 वर्षीय नायेलने एका रम्य बर्फाळप्रदेशात नेऊन प्रपोज केले. नायेलने जेनिफरला हिऱ्यांची अंगठी देऊ माझ्याशी लग्न करशील का अशी विचारणा केली. जेनिफरने देखील त्याला तात्काळ हो म्हणले. त्यानंतर दोघे एकमेकांच्या गळ्यात पडले.

जेनिफर आणि नायेल एकमेकांना जवळपास 4 वर्षापासून ओळखतात. जेनिफर बिल आणि मेलिंडा गेट्स यांची मुलगी आहे. नायेल मिस्त्रमधील सर्वात श्रीमंत तरुणांमधील एक आहे.

 

https://www.instagram.com/p/B7lsAoVnYbL/?utm_source=ig_web_copy_link

जेनिफर यांनी इंस्टाग्राम प्रोफाइलवरुन आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत लिहिले की नायेल नसार, तू जगातील असा एक व्यक्ती आहे. तू मला प्रपोज केलास आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी आता संपूर्ण जीवन तुझ्यासोबत जगू इच्छित आहे आणि त्यासाठी मी आणखी वाट पाहू शकत नाही.

जेनिफरने इंस्टाग्रामवर लिहिले की नायेल सोबत संपूर्ण आयुष्य शिकता शिकता, हसता हसता आणि एकमेकांवर प्रेम करत व्यतित करु इच्छित आहे आणि नायेलवर कोट्यावधीवेळा प्रेम करु इच्छित आहे.

त्यांच्या इंस्टाग्राम फोटोवरुन दिसते की ते कोणत्यातरी रिसॉर्टमध्ये आहेत. परंतु त्यांनी लोकेशन शेअर केले नाही. जेनिफर वॉशिगंटनच्या मेडिनामध्ये जन्मली. तिने स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीमध्ये बायोलॉजीची डिग्री घेतली. तर नायेल कुवेत मध्ये जन्मला, तेथेच मोठा झाला. त्याने स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीमधून इकोनॉमिक्स मॅनेजमेंटची डिग्री घेतली आहे. नायेल एक सेलिब्रिटी शो जंपर आहे.

असे असेल तरी जेनिफरच्या आई वडिलांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. परंतु काही दिवसांपूर्वी बिल आणि मेलिंडाने आपली 26 वी अॅनिवर्सरी साजरी केली होती. जेनिफर आणि नायेल या कार्यक्रमाला उपस्थित होते. असे वृत्त आहे की जेनिफर आपल्या आई वडिलांकडे नायेलसोबत विवाहाची परवानगी मागेल.