बिल गेट्स यांच्या वडिलांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन, अल्झायमरनं होते ग्रस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांचे वडील बिल गेट्स सीनिअर यांचे सोमवारी वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. कुटुंबीयांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ते अल्झायमरने ग्रस्त होते आणि ते बराच काळ आजारी होते. बिल गेट्स सीनियर एक प्रख्यात वकील होते आणि त्यांनी सिएटलच्या वुड कॅनालमधील बीच हाऊसमध्ये येथे अखेरचा श्वास घेतला.

आपल्या वडिलांच्या मृत्यूबद्दल बिल गेटने ट्विट केले की, ‘माझे वडील खरे बिल गेट्स होते. ते असे व्यक्ती होते ज्यांच्याप्रमाणे राहण्याची माझी इच्छा होती. मला आता त्याची आठवण येईल. कुटूंबाच्या निवेदनानुसार, बिल गेट्स सीनियर यांच्या मृत्यूचे मुख्य कारण अल्झायमर होते. 1994 मध्येच त्यांनी वकीली करणे बंद केले. असे मानले जाते की, वडिलांच्या सल्ल्यानंतरच बिल आणि मिलेंडा गेट्स फाउंडेशन अस्तित्वात आले. बिल गेट्स यांनी सांगितले आहे की, एक चित्रपट पाहण्याच्या दरम्यान वडिलांशी झालेल्या चर्चेत त्यांना याची जाणीव झाली की, या जगासाठी त्यांनी काहीतरी केले पाहिजे.

गेट्स फाऊंडेशन माझ्या वडिलांशिवाय घडले नसते
बिल गेट्स म्हणाले की, माझ्या वडिलांशिवाय बिल आणि मिलेंडा गेट्स फाऊंडेशन कधीच अस्तित्वात आले नसते. मी नेहमी मायक्रोसॉफ्ट चालविण्यात खूप व्यस्त असायचो आणि नेहमी चॅरिटीसाठी काही पैसे देत असे. ते पुढे म्हणाले की, माझ्या वडिलांनी हा पाया रचला होता आणि ते कसे कार्य करेल यासाठी कठोर परिश्रम केले. समाजाबद्दलच्या मानवी जबाबदाऱ्याबद्दल त्याला नेहमीच जाणीव होती आणि त्यांना माझ्याकडूनही तेच हवे होते.