राफेल बनवणाऱ्या कंपनीचे मालक ओलिवियर यांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू !

पॅरिस : फ्रान्सचे अरबपती उद्योजक ओलिवियर दसॉ (Olivier Dassault) यांचा एका हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. दसॉ यांच्या मृत्यूबाबत फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रों यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांची कंपनी राफेल फायटर प्लेन सुद्धा बनवते.

दसॉ फ्रान्सच्या संसदेचे सदस्य सुद्धा होते. फ्रान्सचे उद्योगपती सर्ज दसॉ यांचे सर्वात मोठे पुत्र आणि दसॉचे संस्थापक मार्केल दसॉ यांचे नातू ओलिवियर दसॉ यांचे वय 69 वर्ष होते.

मात्र, राजकीय कारणे आणि हितांच्या वादातून वाचण्यासाठी त्यांनी दसॉ बोर्डमधून आपले नाव माघारी घेतले होते. 2020 फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत दसॉ यांना आपले दोन भाऊ आणि बहिणीसह 361वे स्थान मिळाले होते. वृत्तानुसार, रविवारी दसॉ सुट्टी साजरी करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांचे खासगी हेलीकॉप्टर नॉर्मंडी अपघातग्रस्त झाले.

खासदार निवडले गेले होते
दसॉ समुहाकडे अ‍ॅव्हिएशन कंपनीशिवाय ली फिगारो वृत्तपत्र सुद्धा आहे. ते फ्रान्सच्या नॅशनल अ‍ॅसेम्बलीसाठी 2002 मध्ये निवडले गेले होते आणि फ्रान्सच्या ओइस एरियाचे प्रतिनिधित्व करत होते. रिपब्लिकन पार्टीचे खासदार दसॉ यांची संपत्ती सुमारे 7.3 अरब अमेरिकन डॉलर आहे. रिपोर्टनुसार ओलिवियर दसॉ यांच्यासह अपघातात पायलटचा सुद्धा मृत्यू झाला आहे.

राष्ट्रपती मॅक्रों यांनी व्यक्त केले दु:ख
दसॉ यांचे निधन झाल्याने प्रेसिडेंट मॅक्रों यांनी ट्विटरवर लिहिले, ओलिवियर दसॉ फ्रान्सवर प्रेम करत होते. त्यांनी उद्योग, नेते, वायु सेनेचे कमांडर म्हणून देशाची सेवा केली. त्याचे आकस्मिक निधन एक खुप मोठी हानी आहे. त्यांचे कुटुंब आणि आप्तांच्या दुखात सहभागी आहे.