लाचखोर डॉक्टरकडे सापडले कोट्यावधीचे घबाड

पेण (रायगड) : पोलीसनामा ऑनलाईन

रायगड जिल्ह्यातील पेण उपजिल्हा रुग्णालयातील लाचखोर डॉक्टरकडे कोट्यावधींचे घबाड सापडले आहे. महिलेच्या प्रसुतीसाठी तिच्या पतीकडून लाच घेतना या डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. डॉ. विजय गवळी असे या लाचखोर डॉक्टरचे नाव असून त्याच्या घराची एसीबीच्या पथकाने झडती घेतली. झडतीमध्ये गवळीचे पुणे, नवी मुंबई, पेण, पनवेल, कोल्हापुर येथे गाळे, फ्लॅट्स, जागा, बंगले, गाड्या तसेच सोन्या-चांदीचे दागिने अशी कोट्यवधींची संपत्तीआहे.
[amazon_link asins=’B078M16N8P,B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’15a0eef6-bcde-11e8-b4df-ad9210bac507′]

पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर गवळी याने एका महिलेच्या प्रसूतीसाठी तिच्या पतिकडून आठ हजार रुपयांची लाच मागितली होती. पतीने त्याला पाच हजार रुपये देण्याची तयारी दाखवली, पतिच्या तक्रारीनूसार अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. १८) डॉक्टरला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली होती.

पोलीस चौकशीत लाचखोर डॉक्टरकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आढळून आली. पेण येथे व्यापारी गाळा, तसेच मोठी सदनिका, पुणे, सिंहगड, येथे पत्नी व स्वतःच्या नावे निवासी सदनिका, पनवेल, खारघर, नवी मुंबई येथे सदनिका, कोल्हापुर येथे निवासी सदनिका व जागा ,पेण येथे कोट्यवधी रुपये किंमत असलेले २३ गुंठे व २१ गुंठे चे दोन प्लॉट, सुमारे पाच लाख रुपयांचे सोने व पाच किलो चांदी व ६५ लाख रुपयांची रोख रक्कम अशी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आढळून आली आहे. पोलिसांनी या लाचखोर डॉक्टरची मालमत्ता गोठविली आहे.

नागपूर : कळमेश्वर-सावनेर मार्गावर ट्रक-रिक्षाचा भिषण अपघात, पाच ठार  

पोलीस उपायुक्तांच्या अंगठीवर चोरट्यांचा डल्ला 

पुणे : झोपेत असलेल्या इसमावर कोयत्याने वार, आरोपी अटकेत