आता मात्र राजकारण्यांचं ‘अवघड’ झालं ! म्हणे – ‘संविधान’ लागू करण्यात महात्मा ‘गांधीं’ची महत्त्वाची ‘भूमिका’

समस्तीपूर : वृत्तसंस्था – देशातील सामान्य नागरिकांबरोबरच प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांना संविधानाची जुजबी माहिती असणं अभिप्रेत असतं. पण बिहारमधील एका मंत्र्याने तर संविधानाबाबतचा अजब शोध लावला आहे. भारताचं संविधान लागू करण्यात महात्मा गांधींची महत्त्वाची भूमिका होती, असे सांगून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री बीना भारती यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. त्यामुळे भारती यांच्या अज्ञानावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

समस्तीपूर येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी समस्तीपूरच्या पालकमंत्री बीमा भारती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी भाषण करताना अकलेचे तारे तोडले. यावेळी त्यांनी संविधानाच्या निर्मितीचं श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबतच देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना देऊन टाकले.

एवढ्यावरच थांबतील तर त्या बिहारच्या मंत्री कसल्या ! भारती यांनी यानंतर आणखी एक धक्कादायक विधान केले. भारतीय संविधान 1985 मध्ये लागू करण्यात आले होते. त्यांनी भाषण करताना 1955 ऐवजी 1985 मध्ये भारतीय संविधानाचा अंमल सुरु झाल्याचं म्हटले. त्यानंतर चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ सारवासारव करत 1955 मध्ये संविधान लागू झाल्याचे सांगितले.

भारती यांच्या भाषणाचा व्हिडीओ काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यामुळे त्या नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल झाल्या. त्यांच्या या विधानानंतर नेटकऱ्यांनी त्यांना आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरही टीका करण्यास सुरुवात केली. याप्रकरणावर भारती यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन राहणंच पसंत केलं.

फेसबुक पेज लाईक करा –