Bindi Controversy | अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने टिकली प्रकरणावर केली ‘ही’ पोस्ट, सोशल मीडियावर होत आहे व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सध्या टिकली (Bindi Controversy) हा विषय चांगलाच गाजतोय संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर टिकली हा विषय चर्चेत आला आहे. संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकारला आधी टिकली लाव मग तुझ्याशी बोलतो असे वक्तव्य केल्यानंतर टिकली (Bindi Controversy) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात यावर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळतात. त्यातच आता ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मधील अभिनेत्री अनघा म्हणजेच अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हिच्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

अश्विनी ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji) मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली होती. त्यानंतर ती आता स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. अनघाच्या भूमिकेत देखील प्रेक्षक तिला आपलेसे बनवून घेत आहेत. त्याचबरोबर अनघा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. याचाच प्रत्यय तिच्या या पोस्टाने आल्याचे पाहायला मिळाले.

 

अश्विनीने इंस्टाग्रामवर अतिशय भावनिक अशी पोस्ट शेअर केली आहे. अश्विनीचे बाबा कोरोनाच्या काळात गेल्याने अश्विनी आणि तिची आई खूपच खचले होते. अश्विनीने स्वतःला सावरत आईला देखील सावरले होते. अश्विनीने पोस्ट करत लिहिले की, “ठसठशीत टिकली लावणारी माझी मम्मी…काल साधारण नाना गेल्यानंतर दीड वर्षांनी ती घराबाहेर पडली. तिला कायम छान असे तयार व्हायला आवडायचे आणि काल मला सुद्धा वाटले की तिने आधीसारखे तयार व्हावे.

कदाचित #लोककायबोलतील हा विचार जसा सगळ्यांच्याच मनात येतो तसा तिच्या सुद्धा मनात आला.
पण माझ्याकडे पाहून तिने तो विचार #पुरला. ती आधीसारखीच गोड दिसत होती.. पण काहीतरी कमी होते.
काय? तिचे कपाळ. या आधी मी खूप वेळा तिला म्हणाले की तू लाव #टिकली. तुला आवडते न.. मग.
पण ती ऐकायची फक्त. आई कुठे काय करते मध्ये अनघा एकदा म्हणाली होती की लग्नाच्या आधी सुद्धा टिकली लावतोच की मग पती गेल्यानंतर ते बंद का करायचे…मी हा विचार सहज बोलले पण परत विचार केला की तिला असे सारखे टिकली लाव बोलणे योग्य नाही. तिला वाटले तर लावेल ती.

 

आणि काल ती स्वतः म्हणाली, ताई..टिकली लावू का ग? आधी आणि आता सुद्धा आम्ही तिच्याकडून परवानगी घेतो
आणि आज #लोककायबोलतील या विचारात तिने मला विचारावे? मी क्षणात म्हणाले लाव की.
त्यावर सज्जूने टिकली आणून दिली आणि माझी मम्मी पुन्हा एकदा देखणी, रुबाबदार आणि अगदी नानांना जशी आवडायची तशी दिसली”.
अश्विनीची ही पोस्ट सध्या चाहत्यांना आपलीशी वाटत आहे. तर सोशल मीडियावर तिची हि पोस्ट जोरात वायरल होताना दिसत आहे.

 

Web Title :- Bindi Controversy | aai kuthe kay karte fame actress ashwini mahangade share post on bindi controversy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shraddha Kapoor | इतर अभिनेत्रींना मागे टाकत श्रद्धा कपूरने गाठला ‘हा’ सगळ्यात मोठा टप्पा

Leslie Phillips Passed Away | हॅरी पॉटर स्टार लेस्ली फिलिप्स यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन

T20 World Cup | ‘या’ दोन टीममध्ये होणार टी20 वर्ल्ड कपची फायनल, ‘या’ दिग्गज खेळाडूने वर्तवली भविष्यवाणी