‘ही’ महिला ठरली केबीसी १०  पहिली ‘करोडपती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

छोट्या पडद्यावरील  ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रम अजूनही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अमिताभ बच्चन यांच्या या कार्यक्रमामध्ये अनेक स्पर्धक हे करोडपती झाले आहेत.  अत्यंत लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या दहाव्या पर्वाला विनिता जैनच्या रुपाने पहिली करोडपती मिळाली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17a65f67-c6f0-11e8-8156-0db2ff1ba243′]

१५ प्रश्नांच्या या खेळामध्ये विनिता १४ प्रश्नांची अचूक उत्तरं देत १ कोटीचा टप्पा पार केला. १५ व्या आणि सात कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर माहित नसल्यामुळे तिने तिथेच खेळातून माघार घेतली. १५व्या प्रश्नाचं उत्तर देखील तिने अचूक ओळखलं होतं पण खात्री नसल्यामुळे तिने खेळातून माघार घेतली.  विनिता जैन केबीसीच्या इतिहासातील ५वी महिला करोडपती ठरली आहे.
दहाव्या  पर्वात कोट्याधीश ठरलेली विनिता आसामची रहिवाशी आहे. २०१३ मध्ये बिझनेस ट्रीपला गेलेले तिचे पती बेपत्ता झाले. त्यानंतर एकटीने आपल्या मुलांचा सांभाळ करते आहे. आता या रकमेचा वापर ती मुलांच्या संगोपनासाठी करणार आहे.“योगीराज” नाटक येतंय प्रेक्षकांच्या भेटीला

कौन बनेगा करोडपती हा भारतीय दूरचित्रवाणीवरचा एक प्रसिद्ध हिन्दी रियालिटी गेम शो आहे. प्रश्नमंजूषेचे स्वरूप असलेल्या या कार्यक्रमात विजेत्यास पाच कोटी रुपयांपर्यंतचे बक्षिसे दिली जातात. UK च्या प्रसिद्ध “Who Wants To Be Millionaire” मालिकेवरून प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम भारतात निर्माण करण्यात आला.या कार्यक्रमाच्या स्वरूपाने, तसेच आकर्षक बक्षीस व अमिताभ बच्चन यांचे सूत्र संचालन यामुळे हा कार्यक्रम कमी वेळेत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला.

[amazon_link asins=’B0756Z53JN,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c2231659-c6f0-11e8-980f-89a02a5ffe5f’]