‘टाकावू’, ‘सडलेल्या’ भाज्यांपासून होतेय लाखोंची ‘कमाई’, सूरतमध्ये झाला अनोखा ‘प्रयोग’, केंद्रीय मंत्र्याने शेअर केला व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  खराब फळं आणि भाज्यांचा आपल्याला काही उपयोग नसतो. याने घाण पसरते, पण काही ठिकाणी यापासून खत तयार केले जाते. तथापि, खराब फळे आणि भाज्यांची विल्हेवाट लावण्यासाठी सुरतच्या भाजी मंडईने एक उत्तम मार्ग काढला आहे आणि त्याद्वारे लाखोंची कमाई होत आहे. भाजी मार्केटमधून सेंद्रिय कचर्‍यापासून गॅस बनवून सुरत एपीएमसी लाखोंची कमाई करीत आहे. सुरत एपीएमसी खराब फळे आणि भाज्यांपासून गॅस तयार करून गुजरात गॅस कंपनीला पुरवित आहे. यामुळे त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

प्रदूषणापासून मिळत आहे मुक्ती
त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याने प्रदूषणापासून मुक्ती मिळत आहे. वास्तविक, बायोगॅस त्या प्रत्येक गोष्टीपासून बनवता येतो ज्या सडतात. सेंद्रीय कचर्‍यापासून हे सहज बनवता येते. कंपोस्टिंगमुळे गॅस हवेत जातो, परंतु बायोगॅसमधून त्या व्यर्थ जाणाऱ्या गॅसचा वापर मानवी वापरासाठी केला जाऊ शकतो.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिली माहिती
याबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी माहिती दिली. सूरत एपीएमसी खराब भाजीपाल्यापासून गॅस निर्मिती करणारे देशातील पहिले एपीएमसी आहे. दररोज 40 ते 50 टन खराब भाज्या आणि फळांपासून गॅस तयार होत आहेत. एपीएमसी गुजरात गॅसला दररोज 5100 scm बायो सीएनजी विकत आहे. यासाठी सुरत एपीएमसी आणि गुजरात गॅस कंपनी यांच्यात करार देखील झाला आहे.

रोज होत आहे इतके उत्पादन
या संदर्भात सूरत एपीएमसीचे अध्यक्ष रमण जानी म्हणाले की या प्लॅनमध्ये दररोज 50 टन कचर्‍यावर प्रक्रिया केली जात असून 1000 cm गॅस तयार होत आहे.