क्यूबामध्ये ‘कोरोना’ मृत्यू दर कमी करणार्‍या औषधाला भारतात सुद्धा मिळाला ‘ग्रीन’ सिग्नल !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाच्या उपचारासाठी डीसीजीआय म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने बायोकॉनचे औषध टोलीझूमॅब इंजेक्शनला परवानगी दिली आहे. डीसीजीआयनुसार कोरोनाच्या गंभीर रूग्णांच्या उपचारासाठी या इंजेक्शनचा वापर करता येईल. कोरोना रूग्णांवर क्लिनिकल ट्रायलनंतर चांगले परिणाम दिसून आले आहेत. हे इंजेक्शन मागील अनेक वर्षापासून सिरॉसिसच्या रूणांवरील उपचारात वापरले जात आहे. हे औषध क्यूबामध्ये कोरोना डेथरेट कमी करण्यासाठी खुप उपयोगी ठरल्याची चर्चा होती. टोलीझुमॅब बनवणारी कंपनी बायोकॉनच्या एक्झिक्यूटिव्ह चेयरपर्सन किरण मजमूदार शॉ यांनी ही माहिती न्जूय 18 ला दिली आहे.

कोविड-19 ची असाधारण परिस्थिती
किरण शॉ यांनी म्हटले की, कोरोनासारख्या असाधारण स्थितीत जीव वाचवण्यासाठी योग्य उपचाराची गरज आहे. आपण पुढील काही दिवसात 10 लाखांच्या आकड्यापर्यंत जाणार आहोत. सध्या आपल्या समोर मोठा प्रश्न हा आहे की, जर इन्फेक्शन रेट वर गेला तरी आपण डेथ रेट कमी करू शकतो का? अशा स्थितीत टोलीझुमॅब औषध खुप उपयोगी ठरू शकते. परंतु, सध्या याची मोठ्या स्तरावर ट्रायल करण्यात आलेली नाही. डीसीजीआयने या औषधाच्या वापरासाठी मॉडरेटपासून गंभीर रूग्णांपर्यंत सूट दिली आहे.

औषधाच्या किमतीवर काय म्हणाल्या किरण शॉ
टोलीझुमॅबच्या किमतीबाबत किरण शॉ म्हणाल्या की, आपल्याला या औषधाची उपयुक्ततासुद्धा पहावी लागेल. सध्या आम्ही जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा स्थितीत एखाद्या रूग्णाला आयसीयुत ठेवले तर त्याचा खर्च मोठा येऊ शकतो. सरकारला वाटते की, हे औषध लोकांसाठी खुप परवडणारे आहे.

क्यूबात डेथ रेट झाला खुप कमी
शॉ यांनी म्हटले की, क्यूबामध्ये सुद्धा या औषधाच्या वापराने डेथ रेट खुप कमी झाला आहे. आम्ही ट्रायलच्या दरम्यान या औषधाचा वापर मॉडरेटपासून गंभीर रूग्णांपर्यंत केला आहे. परिणाम खुप चांगले दिसून आले. जर क्यूबा या औषधाचा वापर करून आपला डेथ रेट कमी करत असेल तर आपण सुद्धा डेथ रेट कमी ठेवण्यात यशस्वी होऊ.

’हेल्थ सेक्टरमध्ये आणखी गुंतवणूक करावी लागेल’
किरण शॉ यांनी हेदेखील म्हटले की, आपल्याला हेल्थ केयर सेक्टरमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. अन्य क्षेत्रांप्रमाणे या क्षेत्रात सुद्धा इन्सेंटिव्हची गरज आहे. एका काळात ज्याप्रमाणे आयटी सेक्टरकडे लक्ष देऊन ते मोठे करण्यात आले, असेच हेल्थ सेक्टरसाठी सुद्धा करता येईल.