Nora Fatehi चा इन्स्टाग्रामचा DP आणि बायोमध्ये लपलंय ‘हे’ रहस्य, जाणून घ्या संपुर्ण माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही अलीकडेच ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज म्हणून हजर झाली आहे. या शोमध्ये नोरा फतेहीने खूप धमाल केली होती. शोमध्ये मलायका आरोडाच्या जागी नोरा दिसली होती. यावेळी शोमध्ये बरीच मजा आली. तिचे अनेक व्हिडिओही समोर आले आहे. त्याचवेळी ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ मध्ये धमाल केल्यानंतर आता नोरा सेशल मीडियावर कहर करीत आहे. या सर्व प्रकारांमध्ये नोरा फतेहीचा एक फोटो खूप चर्चेत आहे. नोराचा हा फोटो तिच्या चाहत्यांसाठी आश्चर्यचकित करणारा आहे. याबद्दल या डान्सरला प्रश्नावर प्रश्न विचारले जात आहे.

खरं तर अलीकडेच नोरा फतेहीने तिच्या इन्स्टाग्रामचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. चाहते तिचा डीपी पाहून आनंदी होण्याऐवजी आश्चर्यचकित झाले आहे. तिने आपला फोटो लावण्याऐवजी एक असा फोटो लावला आहे ज्यामध्ये ती एका रोबोट सारखी दिसत आहे. या फोटोमध्ये चाहते नोराला विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. काही जण हा प्रोफाईल फोटो लावण्यामागचे कारण विचारत आहे तर काहीजण हा फोटो काढण्यास सांगत आहे.

नोरा फक्त तिच्या फोटोमुळेच नाही तर इतर काही कारणांमुळे चर्चेत आहे. नोराने तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये काहीतरी विचित्र लिहिले आहे, जे कोणाच्याही समजण्यापलीकडे आहे. तिने तिच्या बायोमध्ये लिहिले आहे की, Obbdi Nfsj Sboj 20.10.20.। नोरा व्यतिरिक्त पंजाबी गायक गुरू रंधावा आणि संगीत कंपनी टी-सीरीजनेही आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हाच फोटो ठेवला आहे. नोरा फतेही आणि गुरु रंधावा यांचे नवीन गाणे ‘नाच मेरी राणी’ 20.10.20 रोजी रिलीज होणार आहे. अशा परिस्थितीत हा प्रोफाईल फोटो आणि बायोला लोक त्याच्याशी कनेक्ट करुन पहात आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like