Corona Vaccine : जगातील सर्वात ‘स्वस्त’ लस भारतात येणार?, लसीकरणाला मिळणार गती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने लसीकरण सुरु केलं. दुसऱ्या लाटेत रुग्णाची संख्या जरी घटत असली तरी तिसरी लाट समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढवण्याची आवश्यकता आहे. यावरून केंद्र सरकारने बायोलॉजिकल-ई (Biological-E) बरोबर एक करार केला आहे. केंद्राने या कंपनीला तब्बल तीस कोटी रुपये आधीच दिले आहे. यावरून आता बायोलॉजिकल-ई (Biological-E) कंपनी तीस कोटी डोस राखीव ठेवणार आहे.

HSC Exam : ठाकरे सरकारचा निर्णय ! राज्यातील इयत्ता 12 वीच्या परीक्षा अखेर रद्द

केंद्र सरकारकडून ३० डोससाठी बायोलॉजिकल- ई (Biological-E) कंपनीला १५०० कोटी रुपये देण्यात येणार आहे.
अर्थात एका कोरोना प्रतिबंधक डोससाठी केंद्र सरकाराला पन्नास रुपये द्यावे लागणार आहे.
मात्र बाजारात ही कोरोना प्रतिबंधक लस किती रुपयाला मिळेल हे अद्याप अस्पष्ट आहे.
परंतु, विशेष म्हणजे ही लस जगातील सर्वात स्वस्त लस असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
लसीच्या एका डोसचा दर १.५ डॉलर प्रति डोस म्हणजेच ११० रुपये असणार आहे.

मुकेश अंबानींचा मोठा निर्णय ! कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला 5 वर्ष सॅलरी अन् मुलांना शिक्षण देणार

बायोलॉजिकल- ई (Biological-E) कंपनीला २४ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्याची मंजुरी मिळाली.
कंपनीनं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या नोव्हेंबर २०२० मध्ये सुरू केल्या.
तसेच, ३६० जणांवर करण्यात आलेल्या चाचणीबद्दलची आकडेवारी कंपनीनं जाहीर केलेली नाही.
चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक असल्याची माहिती कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका महिमा डाटला यांनी दिलीय.
आता तिसऱ्या टप्प्यात देशातील १५ ठिकाणी १ हजार २६८ जणांवर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या केल्या जाणार आहे.

Mucormycosis : तज्ज्ञांनी सांगितलं म्युकरमायकोसिस आजारामागील नेमकं कारण; जाणून घ्या

या दरम्यान, ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या कालावधीत बायोलॉजिकल-ई (Biological-E) कंपनी लसींचा साठा करेल.
ही कंपनी बनवत असलेली लस RBD प्रोटिन सब युनिट प्रकारांमधील आहे.
यात SARS-CoV-२ चे RBD स्वरुपाचा वापर अँटिजेन म्हणून केला आहे.
लसीची क्षमता वाढवण्यासाठी त्यात एक CpG १०१८ चा वापर केला गेला आहे.
या लसीचे २ डोस घ्यावे लागतील. यात अंतर २८ दिवसांचं असणार आहे.
म्हणून लसीकरण लवकर पूर्ण होऊ शकणार आहे. अशी माहिती एका वृत्तानुसार समोर आली आहे.