Biometric Identification System | राज्यामध्ये बायोमेट्रिक ओळख (AMBIS) प्रणाली कार्यान्वित ! यंत्रणेचा वापर झाल्यावर गुन्ह्यांची झटपट उकल होऊन दोषसिद्धीच्या प्रमाणात वाढ होईल – ADG रितेश कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Biometric Identification System | ‘ऑटोमोटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम’ (एएमबीआयएस) Automated Multi-Modal Biometric Identification System (AMBIS) या संगणकीय प्रणालीचे उदघाटन गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांच्या हस्ते करण्यात आले. (Biometric Identification System)

 

कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक (पश्चिम) सुरेश मेखला (IPS Suresh Mekhala),पोलीस उपमहानिरीक्षक रंजनकुमार शर्मा (IPS Ranjankumar Sharma), महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक संजय शित्रे (Sanjay Shintre IPS), पिपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Pimpri Chinchwad CP Ankush Shinde), पोलिस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ (IPS Sudhir Hiremath), पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख (IPS Dr. Abhinav Deshmukh), सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक ए.डी. शिंदे (Retired IG A.D. Shinde), प्रदीप देशपांडे (Retired IG Pradeep Deshpande) उपस्थित होते.

"Biometric

 

एएमबी आयएस प्रणाली ही प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असून पोलीस दलाने आधुनिकीकरणाची कास धरून केवळ बोटांचे ठसेच नाही तर तळवे चेहरा व डोळे स्कॅन करुन ते डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस घटकांकडून या यंत्रणेचा वापर झाल्यावर गुन्ह्यांची झटपट उकल होऊन दोषसिद्धीच्या प्रमाणात वाढ होईल असे रितेश कुमार (CID Chief Ritesh Kumar) यावेळी म्हणाले. (Biometric Identification System)

कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी केली. यावेळी गुन्हे अन्वेषण विभागाचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, अंगुली मुद्रा विभागाचे वरिष्ठ तज्ज्ञ रोहोदार कसार, प्रथम तज्ञ पोलीस निरीक्षक अविनाश सरवीर, प्रथम तज्ञ प्रथम तज्ञ पोलीस निरीक्षक रुपाली गायकवाड, यांचेसह अंगुली मुद्रा केंद्रातील सर्व अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रीय कार्यालये जिल्हा कार्यालय येथील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

अशी आहे एएमबीआयएस प्रणाली

 

"Biometric

 

पूर्वी गुन्हेगारांच्या बोटांच्या ठशावरून आरोपीची ओळख पटवली जायची मात्र आता हाताचे तळवे, सीसीटीव्ही फुटेजमधील चेहरा व छायाचित्रावरुनही गुन्हेगारांची ओळख पटविण्यात येणार आहे. या प्रणालीत आरोपींच्या अंगुली मुद्रा पत्रिका, तळहाताचे ठसे, चेहरा व डोळ्यांची बुबुळे हे डिजीटल स्वरुपात जतन करुन ते इतर छायाचित्रांशी जुळविण्याची क्षमता आहे.

 

पोलीस ठाणे स्तरापर्यंत ‘एएमबी आयएस’ यंत्रणा राबविणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य आहे. या यंत्रणेअंतर्गत सुमारे ६.५ लाख अटक व शिक्षाप्राप्त आरोपीचा अभिलेख संगणकीकृत करण्यात आलेला आहे. एएमबीआयएस प्रणाली ही भविष्यात सीसीटीएनएस, प्रिझम, सीसुटीव्ही व राष्ट्रीय स्तरावरील एनएएफआयएस या प्रणालीशी जोडण्यात येणार आहे.

 

राज्यातील सर्व पोलीस ठाणे, परिक्षेत्रीय कार्यालये, पोलीस आयुक्तालय, जिल्हा पोलीस मुख्यालय, अंगुली मुद्रा केंद्रे,
प्रशिक्षण केंद्रे व मध्यवर्ती कारागृह येथे एएमबीआयएस प्रणालीचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर देण्यात आले आहे.
इंटरपोल आणि एफबीआय येथे हे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे.

 

"Biometric

पोलीस ठाण्यात अटक आरोपीच्या अंगुली मुद्रा पत्रिकेची ऑनलाइन नोंदणी करुन त्यांचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा पूर्व इतिहास तपासण्यासाठी व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक
कारवाई करण्यासाठी या संगणकीय यंत्रणेचा उपयोग होणार आहे. एएमबीआयएस प्रणालीतंर्गत देण्यात येणा-या पोर्टेबल एएमबीआयएस या यंत्रणेचा वापर करून
गुन्ह्यांच्या घटनास्थळी मिळालेल्या चान्सप्रिटद्वारे गुन्हेगारांचा शोध घेणे काही मिनिटातच शक्य झाले आहे.
त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमाणात वाढ होवून राज्याच्या दोषसिध्दीच्या प्रमाणात वाढ होणार आहे.

 

एएमबीआयएस प्रणाली ही प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असुन यंत्रणेची गती व अचुकता यामुळे तो इतर प्रणालीपासून वेगळी ठरली आहे.
महाराष्ट्र राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक
कारवाई करण्यासाठी एएमबीआयएस यंत्रणा महत्वाची भूमिका पार पडणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावरील परीक्षणात एएमबीआयएस प्रणालीवर सन २०२० पासून एप्रिल २०२२ पर्यंत
५२ केसमध्ये २.१४ कोटींच्या चोरीस गेलेल्या मालमत्तेच्या प्रकरणात आरोपीचा शोध लावण्यात आला.

 

 

Web Title : –  Biometric Identification System | Biometric Identification (AMBIS) system implemented in the state!
With the use of the system, crime will be solved instantly and the number of convictions will increase – ADG Riteish Kumar


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rupali Thombre Patil on Ketki Chitale | केतकी चितळेंच्या फेसबूक पोस्टवरुन रुपाली पाटील यांचा निशाणा; म्हणाल्या – ‘महिला असली तरी छपरीच तू..’

High And Low Blood Pressure Symptoms | जाणून घ्या उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाबाच्या लक्षणांमधील फरक

Ajit Pawar | पावसाळ्यात पाझर तलावात पाणी भरण्याचा प्रयत्न करण्यात येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार