PM मोदींनंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर बनणार ‘बायोपिक’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर बायोपिक बनवण्याची तयारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. अमाश फिल्म्सचे मालक शिवा शर्मा आणि जीशान अहमद यांनी वाजपेयींवर लिहिलेल्या ‘द अनटोल्ड वाजपेयी’ या पूस्तकाचे सर्व अधिकार विकत घेतले असून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू या सिनेमाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

याविषयी बोलताना शिवा शर्मा म्हणाले कि, ‘द अनटोल्ड वाजपेयी’ हा माझ्या आयुष्यातील अनेक महत्वकांक्षी योजनांपैकी एक असून या हिरोला मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी फार उत्सुक आहे. त्याचबरोबर मला विश्वास आहे कि, प्रत्येक जण वाजपेयींच्या खऱ्या आयुष्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहे. ज्यावेळी मी हे पुस्तक वाचले त्यावेळी मला त्यांच्यातील या गुणांची माहिती मिळाली. आणि त्यामुळेच मी त्यांच्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या सिनेमाच्या स्क्रिप्टिंगचे काम सुरु झाले असून हे पूर्ण झाल्यानंतर दिग्दर्शक आणि कलाकारांची निवड करण्यात येणार आहे. सध्या या सिनेमाचे शीर्षक ‘द अनटोल्ड वाजपेयी’ ठेवण्यात आले असून त्यावर नंतर विचार केला जाईल. भाजपचे जेष्ठ नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट 2018 रोजी निधन झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त –