जगातील सर्वात वृद्ध मॅरथॉन धावपटू ‘फौजा सिंह’वर बनणार बायोपिक ! ‘मेरी कॉम’, ‘सरबजीत’चे डायरेक्टर करणार दिग्दर्शन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मेरी कॉम आणि सरबजीत असे शानदार सिनेमे बनवणारे डायरेक्टर ओमंग कुमार (Omung Kumar) आता एक नवीन बायोपिक बनवणार आहेत. हे बायोपिक जगातील सर्व वृद्ध मॅरथॉन धावपटू फौजा सिंह (Fauja Singh) यांच्यावर आधारीत असणार आहे. 109 वर्षीय फौजा सिंह यांना शीख सुपरमॅन म्हणून ओळखलं जातं.

त्यांनी 89 व्या वर्षी मॅरेथॉन धावपटू म्हणून करिअरला सुरुवात केली होती. तो भारतीय वंशाचे ब्रिटीश नागरिक आहे. फौजा सिंह यांचा जन्म 1 एप्रिल 1911 साली पंजाबमध्ये झाला होता. हा सिनेमा प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंह यांच्या टर्बन्ड टॉर्नेडो या पुस्तकावर आधारीत आहे. ओमंग कुमार, राज शांडिल्य आणि कुणाल सिवदासानी हा सिनेमा प्रोड्युस करणार आहेत.

ओमंग कुमार यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. आमचा नवीन सिनेमा आहे फौजा. लवकरच हा सिनेमा सिनेमागृहात रिलीज होईल असंही त्यांनी सांगितलं आहे. ओमंग कुमार भूमी, मेरी कॉम, सरबजीत अशा सिनेमांसाठी ओळखले जातात. मेरी कॉम या सिनेमाला बेस्ट पॉप्यलर फिल्म साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.