अभिनेत्री बिपाशा बसु आणि करणसिंग ग्रोवरच्या ‘रोमँटीक’ फोटोंची सोशलवर ‘चर्चा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री बिपाशा बसु आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर बॉलिवूडमधील अनेक हॉट कपलपैकी एक आहे. या हॉट कपलनं आपल्या नात्याबद्दल नेहमीच बिंधास्तपणा दाखवला आहे. दोघे सोशलवरही आपलं प्रेम खुलेआम व्यक्त करत असतात. असंच काहीसं सांगणारे या कपलचे काही फोटो समोर आले आहेत जे सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

बिपाशानं तिच्या इंसटाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. फोटो शेअ करताना कॅप्शनमध्ये बिपाशा म्हणते, “माझं प्रेम”

करण आणि बिपाश यांच्या या फोटोत त्यांचा खूपच रोमँटीक अंदाज पहायला मिळत आहे. चाहत्यांनाही त्यांची बाँडिंग आवडली आहे असं दिसत आहे. कारण त्यांच्या अनेक चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सध्या हे रोमँटीक फोटो सोशलवर जोरदार चर्चेत आहेत.

करण आणि बिपाशा खूप कालावधीपासून सिनेमांपासून दूर आहे. ‘अलोन’ या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं. हा सिनेमा खास काही चालला नाही. परंतु सिनेमामुळे दोघांमधील जवळीकता वाढली. या सिनेमानंतरच दोघांनी लग्न केलं होतं.