Bipasha Basu B’day | जॉनच्या ‘त्या’ एका ट्विटमुळे बिपाशा आणि जॉनच्या नात्यात निर्माण झाला दुरावा

Bipasha Basu B'day | happy birthday bipasha basu why did actress broke up with john abraham
file photo

पोलीसनामा ऑनलाइन : Bipasha Basu B’day | आज बॉलीवूडमध्ये अनेक असे जोडपे आहेत जे प्रेक्षकांचे आवडते आहेत.काही जोडपे असे आहेत अनेक वर्ष एकमेकांसोबत रिलेशन मध्ये राहून देखील काही कारणाने विभक्त झाले आहेत. त्यातलेच एक म्हणजे बिपाशा बसू आणि जॉन अब्राहम. बिपाशा बसू आणि जॉन अब्राहम यांच्या जोडीला लोकांनी खूपच पसंती दर्शवली होती. यांचे नाते सगळ्यांनाच ठाऊक होते. प्रत्येक पार्टीत, डिनरला आणि अवॉर्ड शो असो तेव्हा दोघेही एकत्र दिसत असे. मात्र जॉनच्या एका ट्विट मुळे यांच्या नात्यात दरार निर्माण झाली. आज बिपाशा आपला ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊयात नक्की काय होते त्या ट्विट मध्ये. (Bipasha Basu B’day)

अभिनेत्री बिपाशा बसू नेहमीच आपल्या स्टाईल आणि ग्लॅमरने सर्वांनाच मंत्रमुग्ध करत असते. सध्या ती पती करण सिंह ग्रोव्हर आणि लेक देवीसोबत आनंदाने आपले आयुष्य जगत असल्याचे दिसत आहे. मात्र एकेकाळी तिचे नाव जॉन अब्राहम सोबत जोडले गेले होते. तब्बल नऊ वर्षाचे नाते त्यांच्यात होते. मात्र जॉनच्या एका चुकीने त्यांचे नाते संपुष्टात आले होते. हे दोघेही लवकरच लग्न करणार अशा चर्चा देखील पसरल्या होत्या. मात्र एके दिवशी अचानक त्यांच्या ब्रेकअप च्या बातम्या समोर आल्या आणि सर्वांनाच धक्का बसला. (Bipasha Basu B’day)

2014 च्या नव्या वर्षाला जॉन ने एक ट्विट केले होते.
या ट्विट मुळेच बिपाशा आणि त्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.
या ट्विटमध्ये जॉनने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत म्हटले की,
“हे वर्ष तुमच्या आयुष्यात खूप प्रेम आणि आनंद घेऊन येवो… लव्ह जॉन आणि प्रिया अब्राहम”.
यावेळी जॉनने दुसऱ्या एका मुलीचे नाव घेतल्यामुळे बिपाशाला जॉनचे सत्य समजले. जॉन एका एनआरआय मुलीसोबत रिलेशनमध्ये असल्याचे समोर आले आणि या कारणामुळेच जॉन आणि बिपाशाच्या नात्यात फुट निर्माण झाली. मात्र तो ट्विट जॉनने चुकून केल्याचे देखील बोलले जात होते. मात्र या दोघांच्या ब्रेकअपने चाहते नाराज झाले होते.

Web Title :- Bipasha Basu B’day | happy birthday bipasha basu why did actress broke up with john abraham

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rashmika Mandanna | ट्रोलर्सला अभिनेत्री रश्मिका मंदानाने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली…

Sania Mirza Retirement | सानिया मिर्झा टेनिसमधून घेणार निवृत्ती; ‘या’ ठिकाणी खेळणार शेवटचा सामना

 

Total
0
Shares
Related Posts
Pune Lohegaon Airport | State-of-the-art Bag Inspection Machine commissioned at Pune Airport; Passengers will be relieved by reducing the waiting time for inspection; Inspection of about 1100 to 1200 bags in an hour

Pune Lohegaon Airport | पुणे विमानतळावर अत्याधुनिक बॅग तपासणी मशीन कार्यान्वित; तपासणीसाठी होणारे वेटिंग कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार; एका तासात सुमारे 1100 ते 1200 बॅगांची तपासणी