लग्नापुर्वी अभिनेत्री बिपाशाचं ‘या’ 6 अभिनेत्यांसोबत होतं ‘झेंगाट’, आता करण सिंग ग्रोवरसह जगतेय ‘बिनधास्त’ लाइफ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या अंदानी चाहत्यांना घायाळ करणारी त्याचबरोबर चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री बिपाशा बासुचा आज 41 वा वाढदिवस आहे. तिने चित्रपटात अभिनयाच्या जोरावर एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये तिच्या अफेअर्सची चर्चा चांगलीच रंगली होती. लग्नाच्या आधी बिपाशाने अनेक अभिनेत्याला डेट केले आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया काही खास गोष्टी…

बिपाशाच्या पहिल्या प्रेमाविषयी बोलायचे म्हणले तर तिचे नाव प्रथम मिलिंद सोमणशी जोडले गेले. मॉडेलिंग दरम्यान बिपाशा आणि सुपर मॉडल मिलिंद सोमण यांची भेट झाली. असे म्हटले जाते की बिपाशा खूप व्यस्त असल्यामुळे मिलिंदला वेळ देऊ शकली नाही, यामुळे त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि दोघांमध्ये ब्रेकअप झाले.

मिलिंद सोमणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बिपाशा डिनो मोरयासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली. ‘राज’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले. पण दोघांचे हे प्रेम यशस्वी होऊ शकले नाही आणि काही काळानंतर दोघांचेही ब्रेकअप झाले.

डिनो मोरयाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेता जॉन अब्राहमशी बिपाशाचे नाते जुळले. ‘साया’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांची भेट झाली. येथूनच दोघांचे प्रेम सुरू झाले. त्या दिवसांमध्ये, बिपाशा जॉनबरोबरच्या अफेअरमुळे खूप प्रसिद्ध झाली होती आणि ते दोघे जवळजवळ 9 वर्षे एकमेकांना डेट करत होते. इतके दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. मात्र, दोघांच्या ब्रेकअपचे नेमके कारण समजू शकले नाही.

या अभिनेत्रीचे ‘बाहुबली’ स्टार राणा दुग्गाबतीसोबतही अफेअर होते. बिपाशा आणि राणा दुग्गाबती यांनी ‘दम मारो दम’ चित्रपटात एकत्र काम केले होते. राणाशी काही काळ डेटिंग केल्यानंतर बिपाशा त्याच्यापासून दूर झाली.

राणाशी अफेअर झाल्यानंतर बिपाशा हरमन बावेजाच्या प्रेमात पडली. दोघे ‘ढिश्क्याऊं’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान भेटले होते. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर हरमनला डेटिंग करण्याबद्दलही सांगितले होते. पण दोघांचे हे नातेही फार काळ टिकू शकले नाही.

सैफ अली खानसोबतच्या अफेअरमुळे बिपाशाही चर्चेत राहिली आहे. ‘रेस 2’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. पण सैफने अचानक 2012 मध्ये करीनाशी लग्न केले. अशा प्रकारे सैफ आणि बिपाशा दोघांनीही आपलं नातं संपवलं.


या सर्व कलाकारांना डेट केल्यानंतर शेवटी बिपाशाला खरे प्रेम मिळाले. मॉडेलिंग दरम्यान बिपाशा सुपर मॉडल करणसिंग ग्रोव्हरला भेटली होती. दोघांनी 2016 मध्ये काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले होते. लग्नानंतर बिपाशाने स्वत: ला फिल्मी जगातून दूर केले. या अभिनेत्रीला अखेर करणच्या सोबत ‘अलोन’ चित्रपटात पाहिले होते. चित्रपटात बिपाशाचा बोल्ड लूक चाहत्यांना पहायला मिळाला.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/