काय सांगता ! …म्हणून पती करणसिंग ग्रोवरच्या लग्नासाठी बिपाशा बसुने स्वत : केली सगळी तयारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बंगाली बाला बिपाशा बसुच्या बोल्डनेसला तोड नाही. ती सिनेमांपासून दूर असूनही चर्चेत असते. कधी ती आपल्या बोल्ड जाहिरातीमुळे तर, कधी सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या ग्लॅमरस अवतारामुळे चर्चेत येताना दिसते. परंतु सध्या ती चर्चेत येण्याचं कारण आहे ते म्हणजे तिच्या लग्नाचा अल्बम. पती करणसिंग ग्रोवर सोबत बंगाली पद्धतीने लग्न करणाऱ्या बिपाशाने आपला हा अल्बम शेअर केला आहे.
Bipasha Basu
बिपाशाने असे, छोट्या पडद्यावरील शो कसौटी जिंदगी की मधील एका नकली लग्नाला असली टच देण्यासाठी केलं आहे. करणसिंग ग्रोवर या सीसीयरलमध्ये निगेटीव रोल प्ले करताना दिसत आहे. स्टोरीनुसार आता सीरीयलमधील महिला पात्र प्रेरणाचं लग्न होत आहे.
Bipasha Basu 2
या नकली लग्नाला असली दाखवण्यासाठी सीरीयल बनवणाऱ्यांनी बिपाशा बसुकडे मदत मागितली. तिनेही यासाठी नकार दिला नाही. या सीरीयलमध्ये तुम्हाला आता जे लग्न दिसणार आहे त्यामागील सर्व क्रिएटीव काम बिपाशा बसुने केलं आहे.
Bipasha Basu 3
बिपाशा बसुने या लग्नानच्या सेटवर डिझाईनपासून तर कपडे आणि दागिन्यांपर्यंत सर्वात आपल्या अनुभवाचा मुलामा दिला आहे. शुटींगदरम्यानही बंगाली विधी आणि रिती रीवाजांचं पालन करण्यासाठी शो ने पूर्ण नोट बनवली होती.
Bipasha Basu 4
शोविषयी थोडक्यात…
शोच्या ट्रॅकविषयी सांगायचे झाले तर, यात प्रेरणा शर्माने अनुरागला जेलमधून सोडवण्यासाठी मिस्टर बजाजची अट मान्य केली आहे. अनुराग जेलमधून सुटला आहे. अटीनुसार आता प्रेरणा मिस्टर बजाजसोबत लग्न करत आहे. अनुरागला प्रेरणा आणि मिस्टर बजाज यांच्या लग्नाची चाहूलही नाही. सीरीयलमध्ये दाखवलं जात आहे की, एकीकडे अनुराग प्रेरणासोबत लग्न करण्यासाठी तयारी करत आहे तर दुसरीकडे मिस्टर बजाज प्रेरणासोबत लग्न करत आहे.

Loading...
You might also like