4 वर्षात एकाही सिनेमात काम न करणाऱ्या बिपाशाचे फोटो ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मागील चार वर्षांपासून बॉलीवूडमधून गायब असणाऱ्या अभिनेत्री बिपाशा बासूचे काही नवीन फोटो व्हायरल झाले आहेत. बिपाशा बासूचा अखेरचा चित्रपट ‘अलोन’ २०१५ ला आला होता. यानंतर बिपाशा बसू चार वर्षांपासून मोठ्या पडद्यावर दिसली नव्हती. छोट्या पडद्यावरील तिचा ‘डर सबको लगता है’ हा शो (२०१५-१६) ला समाप्त झाला होता. २०१६ मध्ये तिने करण सिंह ग्रोवरशी लग्न केले आणि तेव्हापासून ती चित्रपटांमध्ये दिसायची बंद झाली.
bipasha

बिपाशाने सध्या बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आहे आणि करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केल्यानंतर खासगी आयुष्य एन्जॉय करत आहे. काही दिवसांपासून ती मीडियापासून दूरच आहे. त्यांनतर आता तिचे जिममधून बाहेर पडतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे बिपाशा पुन्हा बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार याविषयी चर्चा सुरु झाली आहे. यावर्षी तिचा ‘आदत डायरीज’ हा नवीन चित्रपट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
karan-singh

जिस्म, राज, अजनबी आणि धूम यांसारखे हिट चित्रपट देणारी अभिनेत्री बिपाशा बासू सध्या बॉलीवूडपासून दूरच आहे. चार वर्षांपूर्वी तिचा शेवटचा चित्रपट रिलीज झाला होता. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००१ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.
bipasha-basu

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like