बॉलिवूडमधून ‘गायब’ झालेली बिपाशा आता बंगाली सिनेमात दाखवणार ‘जलवा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेसपैकी एक बिपाशा बसु दीर्घकाळापासून सिनेमातून गायब असल्याचे दिसत आहे. 2016 साली अ‍ॅक्टर करणसिंग ग्रोवर सोबत लग्न केल्यानंतर बिपाशा बॉलिवूडमधील एकाही प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमध्ये वापसी करण्याऐवजी बिपाशा बसु आता बंगाली सिनेमात एन्ट्री करण्याचा प्लॅन करत आहे.

2009 साली बिपाशाने बंगाली सिनेमा शोब चरित्रो काल्पोनिक मध्ये काम केले आहे. हा तिचा आतापर्यंतचा एकमेव बंगाली सिनेमा आहे. या सिनेमातील तिच्या अ‍ॅक्टींगची खूप स्तुती झाली होती.

एका मुलाखतीत बिपाशा म्हणाली होती की, “मला बंगाली सिनेमात काम करायला आवडेल. आधी मी बंगाली सिनेमात काम करू शकले नाही. कारण मी माझ्या करिअरच्या सुरुवातील मुंबईत शिफ्ट झाले होते. यानंतर मी सिनेमा आणि मॉडेलिंग असाईनमेंटमध्ये बीजी राहू लागले. त्यावेळी माझ्याकडे आणखी काही करण्यासाठी कमी वेळ होता.”

View this post on Instagram

Us❤️ #monkeylove

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu) on

बिपाशा म्हणाली की, “मी कामादरम्यान बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला होता. काही असे प्रोजेक्ट्सही होते जे मला करायचे होते. परंतु काही होऊ शकलं नाही.” प्रोजेक्ट्स न करू शकल्यामुळे बंगाली सिनेमांपासून बिपाशाचे अंतर वाढत गेले.

बिपाशाने सांगितले की, तिची शोब चरित्रो काल्पोनिक सिनेमातील को-स्टार प्रोसनजीत चॅटर्जी सोबत तिची चांगली मैत्री आहे आणि प्रोसनजीत चॅटर्जीने तिला पुन्हा एकदा बंगाली सिनेमात काम करण्यासाठी विचारले आहे. बिपाशा म्हणाली की, “आम्ही आजही एकमेकांशी बोलतो. काही दिवसांपूर्वीच तिने मला विचारले आहे की, तुला बंगाली सिनेमात काम करायचे आहे का ? तर मी तिला म्हणाले का नाही, नक्कीच करेल.”

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like