Coronavirus : ‘कोरोना’च्या संकटादरम्यानच बिहारमध्ये Bird Flu ची ‘दहशत’, पशुपालन विभागानं कोंबड्यांना मारून पुरलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोनामुळे संक्रमितांचा आकडा वाढत चालला आहे. कोविड – 19 च्या महामारी रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु बिहारच्या राजधानी पटनामध्ये बर्ड फ्लूचे संक्रमण पसरण्यास सुरुवात झाल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.

नुकतेच शहरातील विविध भागात करण्यात आलेल्या कावळे आणि इतर पक्षांच्या तपासणीत बर्ड फ्लू आढळला, ज्यानंतर आता लोकांवर कोरोनासह बर्ड फ्लूचा धोका बळावत आहे. पोल्ट्री फॉर्ममध्ये करण्यात आलेल्या बर्ड फ्लूच्या तपासणीवरुन वेटरनीर अधिकाऱ्यांनी मानले की पटनामध्ये बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रकोपादरम्यान बिहारमध्ये बर्ड फ्लूची काही प्रकरणं समोर आली आहेत, त्यामुळे पोल्ट्री फॉर्ममध्ये असलेल्या कोंबड्या मारल्या जात आहेत. बिहार पशुपालन विभागाच्या शेकडो कोंबड्यांना मारुन त्यांना दफन करण्यात आले आहे. बर्ड फ्लू मुळे संक्रमित पक्षांच्या संपर्कात आल्याने हा रोग माणसांमध्ये पसरतो.

जेथे बर्ड फ्लूची प्रकरणं समोर आली तेथे वेटरनरी डॉक्टरांच्या गटाने त्या त्या प्रभावित भागात सर्विलांसवर ठेवले आहे. येथे औषधांची देखील फवारणी करण्यात आली आहे. आता केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार कोंबड्यांना मारण्याचे काम केले जात आहे, यासह पशुपालन विभागाच्या सुचनांनुसार लोकांना आजारी कोंबड्यांच्या संपर्कात येण्यापासून वाचवण्यासाठी आणि पंखांना वैगरे हात लावल्यानंतर साबनाने हात धुण्यास सांगण्यात आले आहे.

बर्ड फ्लू पक्षांच्या मल, मूत्र, पंख किंवा दुषित पाणी याच्या संपर्कात आल्याने माणसांत संक्रमण पसरते. बाधित व्यक्तीला ताप, सर्दी, डोकेदुखी, श्वास घेण्यास समस्या, नाक वाहणे अशी लक्षण दिसू लागतात. अशी लक्षण दिसल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. तर तज्ज्ञांच्या मते लॉकडाऊनमुळे लोक घरातच आहेत. त्यामुळे बर्ड फ्लू पसरण्याची शक्यता बरीच कमी आहे.