Bird flu | बर्ड फ्लूमुळे 11 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूने वाढली चिंता, जाणून घ्या – कसा आहे व्हायरस, त्याची लक्षणे आणि बचाव

नवी दिल्ली : Bird flu |  कोरोनाचा कहर सुरू असताना आणखी एक भीतीदायक बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटल (AIIMS HOSPITAL) मध्ये एव्हियन इन्फ्लूएंजा H5N1 (Bird Flu) च्या रूग्णाचा पहिला मृत्यू झाला आहे. येथे 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. रूग्णाच्या मृत्यूनंतर संपर्कात आलेल्या सर्व हॉस्पिटल कर्मचार्‍यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

बर्ड फ्लू (Bird Flu) बाबत आतापर्यंत दिलासादायक बाब ही होती की अजूनपर्यंत यामुळे मृत्यूची बातमी नव्हती. परंतु आता 11 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूने सर्वांना हैराण केले आहे. यामुळे सरकारची चिंता आणखी वाढली आहे.

Bird flu | the death of an 11 year old child from bird flu has raised concern know what is this virus its symptoms and prevention

पक्षांमधून मनुष्यात पसरतो बर्ड फ्लू (Bird Flu)

मनुष्यात बर्ड फ्लू एखाद्या मेलेल्या किंवा जिवंत पक्षाच्या संपर्कात आल्याने होतो. बर्ड फ्लूने संक्रमित पक्षाची बीट किंवा लाळेत हा व्हायरस आढळतो. अनेकदा हवेतून सुद्धा हा संसर्ग पसरतो.

श्वासाद्वारे हा मनुष्याच्या शरीरात प्रवेश करू शकतो. या व्हायरसबाबत एक दिलासादायक बाब म्हणजे याचा संसर्ग आतापर्यंत केवळ पक्षातून माणसात दिसून आला आहे. मनुष्याकडून मनुष्याकडे संसर्गाचे प्रकरण अजूनपर्यंत समोर आलेले नाही. जे लोक पोल्ट्री फार्ममध्ये थेट संपर्कात येतात त्यांनी सावधगिरी बाळगावी.

बर्ड फ्लूची लक्षणे

बर्ड फ्लूच्या प्रमुख लक्षणांमध्ये कफ, डायरिया, ताप, श्वासाशी संबंधीत समस्या, डोकेदुखी, मांसपेशीमध्ये वेदना, पोटात वेदना, उलटी, निमोनिया, घशात खवखव, नाक वाहणे, अस्वस्थता, डोळ्यात इन्फेक्शनसारखी समस्या होऊ शकते. संसर्गाची कोणतीही शंका असेल तर डॉक्टरांशी संपर्क करा.

ही आहे बचावाची पद्धत

> हात वारंवार साबणाने धुवा. सुमारे 15 सेकंदपर्यंत हात धुवा.

> बाहेर जाताना सॅनिटायजरसोबत ठेवा. हात धुता येत नसतील तेव्हा सॅनिटाइज करा.

> संक्रमित पोल्ट्री फार्ममध्ये जाणे टाळा. तिथे काम करणार्‍या लोकांच्या संपर्कात येणे टाळा.

> पोल्ट्री फार्मचे कर्मचारी किंवा तिथे जाणार्‍या लोकांनी पीपीई किट घातला पाहिजे.

> डिस्पोजेबल ग्लव्हज घाला. वापरानंतर ते नष्ट करा.

> कपडे पूर्ण हाताचे घाला आणि शूज, चप्पल डिसइन्फेक्ट करत रहा.

> शिंकणे किंवा खोकताना तोंड व्यवस्थित कव्हर करा.

> श्वासाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी मास्क घालून ठेवा.

> जर आजारी असाल तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

> वापरानंतर टिश्यू पेपर डस्टबिनमध्ये टाका.

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडेंचा उपचारा दरम्यान मृत्यू; झाला होता खुनी हल्ला

Gold Silver Price Today | सोन्याचे दर चार दिवसानंतर वधारले तर चांदीची घसरण सुरूच; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Bird flu | the death of an 11 year old child from bird flu has raised concern know what is this virus its symptoms and prevention

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update