Birthday Special : सर्वात जास्त 20 पदव्या असणारा IAS ऑफिसर, जो 4 महीन्यात नोकरी सोडून बनला ‘पावरफुल’ मंत्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या युवकाचे नाव डॉ. श्रीकांत जिचकर होते. त्यांना भारतातील सर्वात उच्चशिक्षित व्यक्ती म्हटले जात होते. त्यांनी करियरची सुरूवात एमबीबीएस डॉक्टर म्हणून केली होती. नंतर नागपुरमधून एमडी केले. त्यांना त्यावेळी देशातील सर्वात जास्त शिक्षित व्यक्ती म्हटले जात होते. त्यांच्याकडे 20 पेक्षा जास्त पदव्या होत्या. प्रथम ते आयपीएस बनले. नंतर आयएएससाठी निवड झाली. दोन्ही वेळा त्यांनी या शानदार नोकर्‍या नाकारल्या. 14 सप्टेंबर 1954 च्या दिवशी जिचकर यांचा जन्म झाला होता. लिम्का बुकने त्यांना देशातील सर्वात योग्य व्यक्ती म्हटले होते.

डॉ. श्रीकांत जिचकर 1978 मध्ये इंडियन सिव्हील सर्व्हिसेस एग्झामला बसले. त्यांचे सिलेक्शन भारतीय पोलीस सेवा म्हणजे आयपीएससाठी झाले. नंतर त्यांनी ते सोडले. ते पुन्हा परीक्षेला बसले. यावेळी त्यांची निवड आयएएस म्हणून झाली. चार महिन्यानंतर त्यांनी त्या नोकरीचा राजीनामा दिला. कारण होते निवडणुकीच्या रिंगणात उडी मारण्याचे. 1980 मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाले. 26 वर्षाच्या वयात ते देशातील सर्वात तरूण आमदार बनले.

आता श्रीकांत जिचकर यांच्या इतर पदव्यांबाबत जाणून घेवूयात. त्यांनी एलएलएम म्हणजे इंटरनॅशनल लॉ मध्ये पोस्ट गॅ्रज्युऐशन केले. नंतर डीबीएम आणि एमबीए (मास्टर्स इन बिझनेस अडमिनिस्ट्रेशन) केले. ते एवढ्यावरच थांबले नाही. डॉ. श्रीकांत जिचकर यांनी पत्रकारितेचे सुद्धा शिक्षण धेतले, बॅचलर ऑफ जर्नालिझमची डिग्री घेतली. नंतर संस्कृतमध्ये डीलिट (डॉक्टर ऑफ लिटरेचर) मिळवली. जी कोणत्याही युनिव्हर्सिटीची सर्वोच्च डिग्री असते.

त्यांनी समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, इंग्रजी साहित्य, दर्शन शास्त्र, राज्यशास्त्र, प्राचीन भारतीय इतिहास, पुरातत्व आणि मानसशास्त्रात सुद्धा एमए केले होते. सर्वात विशेष म्हणजे त्यांनी या सर्व पदव्या मेरिटमध्ये राहून मिळवल्या. अभ्यासादरम्यान त्यांना अनेकदा गोल्ड मेडल मिळाली. 1973 पासून 1990 पर्यंत त्यांनी 42 युनिव्हर्सिटीच्या परीक्षा दिल्या.

श्रीकांत जिचकर एवढ्यावरच थांबले नाहीत, ते महाराष्ट्राचे सर्वात शक्तीशाली मंत्री बनले. त्यांच्याकडे त्यावेळी 14 विभाग होते. तेथे त्यांनी 1982 पासून 85 पर्यंत काम केले. याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 1986 मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य बनले. येथे 1992 पर्यंत ते होते. 1992 पासून 1998 च्या दरम्यान ते राज्यसभेत सुद्धा होते.

जेव्हा 1999 मध्ये डॉ. जिचकर राज्यसभेत पराभुत झाले तेव्हा त्यांनी आपला फोकस प्रवासावर केंद्रीत केला. ते देशातील अनेक भागात गेले आणि तेथे आरोग्य, शिक्षण आणि धर्माबाबत त्यांनी भाषणे दिली. त्यांनी युनेस्कोमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. डॉक्टर जिचकर यांच्याकडे देशातील सर्वात मोठी पर्सनल लायब्ररी होती. ज्यामध्ये 52000 पेक्षा जास्त पुस्तके होती. डॉ. जिचकर यांचे नाव लिम्का बुक ऑफ रिकॉर्डमध्ये भारतातील सर्वात जास्त शिक्षित व्यक्ती म्हणून नोंदले गेले.

जिचकर एक अकॅडमिक, पेंटर, प्रोफेशनल फोटोग्राफर आणि स्टेज अ‍ॅक्टर होते. त्यांनी 1992 मध्ये एका शाळेची स्थापना केली. नंतर त्यांनी एकट्याने महाराष्ट्रात संस्कृत विद्यापीठ स्थापन केले आणि त्याचे चान्सलर बनले.

या प्रतिभाशाली व्यस्तीचा मृत्यू खुपच लवकर झाला. 02 जून 2004 च्या रात्री डॉ. श्रीकांत जिचकर कारने आपल्या मित्राच्या फॉर्मवरून घरी नागपूरकडे निघाले. ते स्वता कार चालवत होते. वाटेत त्यांची कार एका बसवर आदळली. या दुर्घटनेत 49 वर्षांच्या वयात त्यांचे निधन झाले. त्यांचे वय खुप कमी होते पण तो कालावधी अनेक बाबतीत खुप महत्वाचा होता. त्यांनी अनेक भूमीका पार पाडल्या. खुप अभ्यास केला आणि राजकारणात सुद्धा खुप काम केले.