जाणून घ्या, शाहरूख, सलमान आणि बिग बी यांच्यासह ‘या’ टॉपच्या 10 कलाकारांचं मुळ गाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मायानगरी मुंबई ही बॉलिवूडच्या कलाकारांची कर्मभूमी मानली जाते. मात्र तुम्हाला माहित आहे का तुमच्या आवडत्या अभिनेत्याचा जन्म कोणत्या शहरात झाला आहे. चला जाणून घेऊया.

१) शाहरुख खान –
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा जन्म दिल्ली येथे झाला. शाहरुख खान आज ५००० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

२) सलमान खान –
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. सलमान खान आज २१०० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

३) अजय देवगन –
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता अजय देवगनचा जन्म दिल्ली येथे झाला. अजय देवगण आज २५५ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

४) अमिताभ बच्चन –
बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा जन्म उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झाला. अमिताभ बच्चन यांच्याकडे आज जवळपास २८०० कोटींची संपत्ती आहे.

५) अक्षय कुमार –
अक्षय कुमारचा जन्म पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला होता. आज अक्षय कुमारची मालमत्ता जवळपास १८०० कोटी आहे.

६) आमिर खान –
बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्ट म्हणून ओळखल्या जाणार्‍या आमिर खानचा जन्म मुंबई, महाराष्ट्रात झाला असून आज आमिर खानची मालमत्ता १४०० कोटी आहे.

७) हृतिक रोशन –
बॉलिवूडचा देखणा अभिनेता हृतिक रोशनचा जन्म मुंबई, महाराष्ट्रात झाला. हृतिक रोशन आज जवळपास २९०० कोटींची त्याच्याकडे मालमत्ता आहे.

८) रजनीकांत –
दक्षिणेचा प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांचा जन्म कर्नाटकच्या बेंगलुरु येथे झाला. रजनीकांत यांना आज दक्षिण भारतात ईश्वराचा दर्जा देण्यात आला आहे.

९) प्रभास –
प्रसिद्ध अभिनेता प्रभासचा जन्म तामिळनाडूच्या चेन्नई येथे झाला होता. आज प्रभास दक्षिणेत इतका प्रसिद्ध आहे की त्याच्या सिनेमातील प्रत्येक चित्रपट पहाण्यासाठी लाखो लोकांची गर्दी होते.

१०) महेश बाबू –
दक्षिणचे प्रसिद्ध अभिनेते महेश बाबूंचा जन्म तामिळनाडूच्या चेन्नई येथे झाला. महेश बाबू आपल्या अनोख्या स्टाईलमुळे खूप प्रसिद्ध झाले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –