Birthday : अभिनेता अजय देवगणनं लाडक्या ‘न्यासा’ला केलं ‘बर्थडे विश’ ! फोटो शेअर म्हणाला…

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवू़ड स्टार अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. न्यासाचा जन्म 20 एप्रिल 2003 रोजी मुंबईत झाला आहे. आज ती आपला 17 वा वाढदिवस साजरा करत आहे. वडिल अजय देवगणनं तिला खास अंदाजता शुभेच्छा दिल्या आहेत. अजयनं एक सेल्फी शेअर केला आहे. यात अजय देवगण आणि न्यासा एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. सेल्फी पोस्ट करत अजयनं तिला वाढिदिवसानिमित्त विश केलं आहे.

पोस्ट शेअर करत अजय देवगण म्हणतो, “हॅप्पी बर्थडे बेटी. तुल आज आणि कायमस्वरूपी प्रत्येक आनंदासाठी शुभेच्छा.” अजयनं त्याच्या या पोस्टमध्ये पत्नी आणि अभिनेत्री काजोलला देखील टॅग केलं आहे. न्यासाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं व्हाईट कलरचा ड्रेस घातला आहे. अजयनं ब्लू कलरचा टीशर्ट घातला आहे. दोघंही खूप शानदार दिसत आहेत.

अजयनं शेअर केलेला फोटो लगेच सोशलवर व्हायरल झाला. त्याची ही पोस्ट पाहून अनेक चाहत्यांनी लाईक आणि कमेंट केलं आहे. चाहतेही न्यासाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.