वाढदिवसाचा केक तलवारीने कापणारा इस्लामपूर पोलिसांच्या जाळ्यात

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईन

वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाऱ्या तरुणाला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. तलवारीने केक कापतानाचे फोटो सोशल मिडियावर पाठवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने या तरुणाला आज (मंगळवार) अटक केली असून त्याच्याकडून तलवार आणि मोबाईल जप्त केला आहे.

[amazon_link asins=’B078RKPPGP,B01JOKU9CK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’87aad695-bb53-11e8-ad5c-cdff2f6fec0b’]

बिलाल मुबारक मणेर (वय २७, रा. सावकार कॉलनी, इस्लामपूर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
इस्लामपूर परिसरात काही दिवसांपूर्वी बिलाल मणेर याने वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याचे फोटो पसरवण्यात आले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी चौकशी केल्यानंतर तो तलवार घेऊन सतत फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली.

[amazon_link asins=’B019592KZY,B01M6ZGIWM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a22c70d-bb53-11e8-9103-07d80daa0d93′]

मंगळवारी तो इस्लामपुरातील प्रशासकीय इमारतीजवळ येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. दुपारी पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून कमरेला लावलेली एक तलवार, एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याला इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील, संतोष अस्वले, राहुल जाधव, सचिन कनप, चेतन महाजन यांनी ही कारवाई केली.