भाईजानने असा सेलिब्रेट केला त्याचा वाढदिवस

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान याचा आज ५३वा वाढदिवस. सलमानचा वाढदिवस म्हणलं कि त्याच्या सर्व चाहत्यांना उत्सुकता असते ती म्हणजे त्याने आपला वाढदिवस कसा साजरा केला हे पाहण्याची. चला तर मग पाहुयात भाईजानने आपला वाढदिवस नेमका कसा साजरा केला.

बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रिटींचे वाढदिवस म्हटलं की चाहत्यांमध्येच नव्हे तर, कलाकारांमध्येही प्रचंड उत्साह पाहायला मिळतो.आशा काही सेलिब्रिटींच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता सलमान खान.सलमानने त्याच्या जवळच्या मित्र मैत्रिणींसोबत पनवेलच्या फार्म हाऊसवर केक कट करून आपला 53 वा वाढदिवस साजरा केला.तो यावेळी अतिशय आनंदी आणि मौज मजेच्या मूड मध्ये असल्याचे फोटोमधून दिसत आहे.त्याने फोटोग्राफर्सना देखील यावेळी वेगवेगळ्या पोझ दिल्या.

अनेक वेळा सलमानने त्याचा वाढदिवसाचे सेलीब्रेशन पनवेल येथील फार्म हाऊसवर जवळच्या मित्र मैत्रिणींबरोबर केले आहे.सेलिब्रेटींच्या तुलनेत सलमानची लोकप्रियता अधिक असल्याने या लाडक्या अभिनेत्याला चाहत्यांकडून सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रोफेशनल आयुष्यात हिरो असणारा सलमान खऱ्या आयुष्यातही आहे हिरो…. 
सलमान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यात तर हिरो आहेच शिवाय त्याने बीइंग ह्यूमन फाउंडेशन सारख्या संस्थेमार्फत भारतातील वंचित लोकांसाठी शिक्षण आणि आरोग्य सेवा. आणि संस्थेच्या माध्यमातून ११९४ जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून खासगी आयुष्यतही हिरोचेच कार्य केले आहे.