बर्थ डे स्पेशल – ‘सुपरस्टार रजनी’

मुंबई : वृत्तसंस्था – अस्सल मराठी कुटुंबात जन्म झालेला साऊथचा सुपर स्टार रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० मध्ये झाला . बॉलिवूड मध्ये ही कोणाला एवढी लोकप्रियता मिळाली नाही तेवढी अफाट लोकप्रियता रजनीकांत यांना मिळाली आहे. अनेक वेळी साऊथच्या चाहत्यांकडून त्यांच्या चित्रपटाच्या वेळी हवन करून पूजा घालण्यात येते रजनीकांत यांचा चित्रपट रिलीज होणार असेल की चाहत्यांसाठी एक उत्सवाचे वातावरण होऊन जाते. रजनीकांत यांची अभिनयाची वेगळी शैली यामुळे ते प्रसिद्ध आहेत  याच वेगळ्या शैली मुळे आणि त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना ‘सुपर स्टार रजनी ‘ म्हणले जाते. तमिळ चित्रपटा  बरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटात ही अभिनय केला आहे.

रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० मध्ये झाला रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव  गायकवाड  होते त्यांचे वडील  रामोजीराव गायकवाड हे पोलिस कॉन्‍स्‍टेबल होते आणि आई गृहिणी होती. चार भावंडांमध्ये  रजनीकांत हे शेवटचे अपत्‍य. रजनीकांत ९ वर्षांचे असताना त्‍यांच्‍या आईचे निधन झाले. बालपणापासून खेळाची प्रचंड आवड. अभ्‍यासातही हुशार. त्‍यांच्‍या दंगेखोर स्‍वभावाला आळा बसावा म्‍हणून त्‍यांच्‍या मोठ्‍या भावाने रामकृष्‍ण मठामध्‍ये नाव नोंदवलं. रजनीकांत यांनी तेथे वेदाचे शिक्षण घेतले. लहानपणा  पासूनच त्यांनी  मठामधील सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यास सुरवात केली महाभारतावरील एका नाटकात त्‍यांना एकलव्‍याच्‍या मित्राची भूमिका करण्‍याची संधी मिळाली. ही भूमिका दुय्‍यमअसूनही त्यांनी आपली छाप सोडली . त्यावेळी  तिथे उपस्थित  असलेले कन्‍नड कवी डी. आर. बेंद्रे यांनी रजनीकांत महानायक होणार, असे भविष्‍य वर्तवले होते.

‘कंडक्‍टर’  म्हणून केले काम 
शालेय शिक्षण घेत असतानाच रजनीकांत यांनी अनेक मेहनतीची  कामे केली दरम्यान वयाच्‍या २१ व्‍या वर्षी त्‍यांची बंगळुरू वाहतूक सेवेमध्‍ये कंडक्‍टर म्‍हणून नियुक्‍ती झाली. नोकरी करत असताना त्यांना ‘टोपी मुनियप्‍पा यांनी आपल्या  नाटकामध्ये काम करण्याची संधी दिली याच वेळेस ‘मद्रास फिल्‍म इन्‍स्‍टिट्‍यूट’ची एक जाहिरात त्‍यांच्‍या वाचनात आली. याच वेळेस त्यांनी  चित्रपट अभ्‍यासक्रम शिकण्‍याचे  ठरवले यासाठी त्यांच्या घरच्यांकडून  विरोध झाला .मात्र यासाठी  त्‍यांचा मित्र राज बहाद्‍दूने पाठिंबा देऊन त्‍यांना या संस्‍थेत प्रवेश मिळवून देण्‍याचे सहकार्य  केले. संस्थेत शिकत असताना त्यांनी तामिळ भाषा ही शिकली.

चित्रपटसृष्टीत पदार्पण 
वयाच्या२५ व्या वर्षी त्यांनी १९७५ मध्ये ‘अपूर्वा रागंगल’ या तमीळ चित्रपटात भूमिका केली यात त्यांची  भूमिका तापट नवऱ्याची होती . हा चित्रपट कथानकावरून वादग्रस्त ठरला मात्र वृत्तपत्रामधून त्यांच्या छोट्या आणि प्रभावी कामाचे कौतुक झाले. त्‍यांचा दुसरा चित्रपट ‘अंथुलेनी कथा’ हा तेलगू भाषेत होता. यानंतर त्यांना  ‘बालूजेनू आवरगल,’ ‘वय धिनीलली,’ ‘शिलगम्‍मा चेंपिडी’ इत्‍यादी चित्रपटात त्‍याला छोट्‍या-मोठ्‍या भूमिका मिळाल्‍या. यातील बहुतेक चित्रपट ‘बालचंदर’ यांनीच दिग्‍दर्शित केले होते.त्यामुळे  बालचंदर यांचा उल्लेख तेआपली आई असाच करतात. मुथुरामन यांच्‍या भुवन ओरु केलवीकुरी या चित्रपटात त्यांना पहिली सकारात्मक भूमिका करण्याची संधी मिळाली  या जोडीने २५ चित्रपटात एकत्र काम केले . रजनीकांत यांनी १९८० ते ९० या १० वर्षांत  ३ भाषांमध्‍ये सुमारे १०० चित्रपटात प्रमुख भूमिका गाजवल्‍या

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश

१९८३ मध्ये रिलीज झालेल्या ‘अंधा कानून’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला . अंधा कानून या चित्रपटा  बरोबर भगवान दादा (१९८६), दोस्ती दुश्मनी (१९८६), चालबाज (१९८९),फरिश्ते (१९९१),  फुल बने अंगारे (१९९१) बुलंदी (२०००) यांसारख्या  चित्रपटात काम केले  २००२ पासून २०१० या मधल्या काळात त्यांना फारसे  काही यश मिळाले नाही परंतु  त्यांनी परत दमदार एंट्री घेऊन  स्वतःला सिद्ध केल.  म्हणतात ना वय आणि अपयश  हे कोणालाही थांबवू शकत नाही असेच काही रजनीकांत यांच्या बाबतीत घडले आहे आयुष्यात अनेक चढ -उतार  पाहून  कठीण परिश्रम घेऊन आज इतक्या वर्षांनंतरही त्यांनी आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे.

रजनीकांत  यांनी  लता  यांच्याशी २६ फेब्रुवारी १९८१ रोजी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे त्यांनी लग्न केले.  पुढे दोघांनाही सौंदर्या आणि ऐश्वर्या अशा दोन मुली झाल्या  लता ८० च्या दशकामध्ये गायिका म्हणून सिनेमांशी जोडलेल्या होत्या. त्या गायिकेसोबतच निर्मात्यासुद्धा आहे. याशिवाय त्या ‘द आश्रम’ या शाळेच्या संचालिका आहेत. ऐश्वर्या हीने धनुष्य सोबत लग्न केले असून ती सध्या  डायरेक्टर आहे .

भारत सरकारने रजनीकांत यांना  २००० साली पद्मभूषण आणि २०१६ साली  पद्मविभूषण ने सन्मानित केले आहे.