आश्चर्यकारक ! मराठवाड्यात ‘इथं’ स्मशानभूमीत साजरा होतो ‘वाढदिवस’, ‘भजन’ अन् ‘योगासनं’ही देखील

निलंगा : पोलीसनामा ऑनलाईन – स्मशानभूमीकडे जायचे म्हटले तर आपण एकटे जाणे टाळतो. कोणी गेलं तरच तेथे जातो. परंतु असंच बसत नाही किंवा कोणते सेलिब्रेशनही करत नाही. मात्र स्मशानभूमित भजन, किर्तन आणि वाढदिवस साजरा झाल्याचे तुम्ही ऐकले किंवा पाहिले आहे का?, असा विचार करायलाही आपण घाबरतो. मात्र निलंग्यातील एका स्मशानभूमित हे सर्व कार्यक्रम साजरे केले जातात.

निलंगा तालुक्‍यातील तब्बल बावन्न सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन समशानभूमीच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते. या संघटनांचे कार्यकर्ते दररोज पहाटे जाऊन हे काम करायचे. जी उजाड समशानभूमी होती तिचे चित्र बदलून गेले. मोकळ्या परिसरात जवळपास दोन हजार झाडे लावून कार्यकर्त्यांनी ती जगवली आहेत. तसंच अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची कुठे सोय नव्हती. तेथे आता ५६ बाकडे आहेत. तर उघड्यावर होणारे अंत्यविधी आता शेडमध्ये होतात. या सर्व सुशोभिकरणामुळे ही स्मशानभूमि लक्षवेधी ठरत आहे.

कार्यकर्त्यांनी या स्मशानभूमीचे नावही ‘शांतिवन’ असे ठेवले आहे. या स्मशानभूमिचे सुशोभिकरण केल्यामुळे येथे फक्त अंत्यविधीच होत नाहीत. तर तेथे इतर कार्यक्रमही घेतले जातात. यासाठी पुढाकार घेतला तो मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष एम. एम. जाधव यांनी त्यांचा वाढदिवस येथील स्मशानभूमीत साजरा करण्यात आला. त्यानंतर लोकांनी यातून प्रेरणा घेऊन इतर उपक्रम सुरू केले.

दरम्यान, आता या स्मशानभूमीत शहरातील भजनी मंडळे सायंकाळी भजन सादर करतात. तर काही युवकांनी आपले वाढदिवस येथे साजरे करत अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like