Birthday : ‘बोल्ड’ आणि ‘टॉपलेस’ सीन्ससाठी फेमस होती ममता कुलकर्णी ! आज बॉलिवूडमधून गायब

पोलिसनामा ऑनलाइन –आज अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचा आज वाढदिवस आहे. ममता कुलकर्णी हिचा जन्म 20 एप्रिल 1972 रोजी मुंबईत जन्म झाला आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्याबद्दल काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत. ममताच्या वादग्रस्त आयुष्यावर आपण एक नजर टाकणार आहोत. अनेकांना या गोष्टी माहीत नसतील.

1993 साली आलेल्या तिरंगा सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु ममता कुलकर्णी तिनं केलेल्या एका आयटम साँगमुळे ती खरी प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने काही सिनेमात काम केलं. सबसे बडा खिलाडी, करन अर्जुन, आशिक आवारा आणि चायना गेट अशा सिनेमांमध्येही ती झळकली होती.

https://www.instagram.com/p/B5x0qQDppDL/

पण ‘चायना गेट’ या चित्रपटात ममता कुलकर्णीला जो रोल मिळाला त्यामागे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हात असल्याचं समोर आलं आणि ममताचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आले. ‘चायना गेट’ या सिनेमात ममताला रोल मिळवून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली ती अंमली पदार्थ तस्कर विकी गोस्वामी याने… यामुळे ममतेचे अंडरवर्ल्ड कनेक्शन किती घनिष्ठ आहेत, हे सिद्ध झाले.

1993 सप्टेंबरच्या स्टारडस्टच्या अंकासाठी ममतानं टॉपलेस फोटोशुट केलं होतं. याचा अनेक स्तरातून विरोध करण्यात आला होता. ममतानं काजोल, शाहरुख खान, सलमान खान यांच्यासोबत करण अर्जुन सिनेमात काम केलं. या सिनेमातही तिनं टॉपलेस सीन दिले यानंतर तिची खूप चर्चा होऊ लागली. यानंतर तिला सिनेमात बोल्ड रोल मिळू लागले. अक्षय कुमार सोबत सबसे बडा खिलाडी या सिनेमातही तिनं बोल्ड सीन दिले.

टॉपलेस सीनव्यतिरीक्त ड्रग रॅकेट कॉन्ट्रोव्हर्सीमध्येही ती अडकली आहे. 2016 मध्ये पोलिसांनी तिच्यावर ड्रग सप्लायचा आरोप लावला होता. ठाणे पोलिसांनी 2016 साली तब्बल 2 हजार कोटींच्या अंमली पदार्थ जप्ती प्रकरणी कारवाई केली होती. या कारवाईत विकी गोस्वामीचे नाव समोर आले होते. धक्कादायक म्हणजे ममता कुलकर्णीचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा दुजोरा ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिला.

2002 साली आलेल्या कभी तुम कभी हम या सिनेमात ममता शेवटची दिसली होती. यानंतर ती हिंदी सिनेमात काम करताना दिसली नाही. 2003 मध्ये तिनं बांग्लादेशी सिनेमात काम केलं. 2013 साली तिनं विक्रम गोस्वामी सोबत लग्न केलं.