गणेश जगताप यांची पोलिस दलात ‘नेत्रदिपक’ कामगिरी !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गणेश जगताप यांना पोलिस महासंचालक पदक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यासह पुणे भुषण पुरस्कार विजेते, पुणेरत्न वर्दितील माणुसकी पुरस्कार, राजस्तरीय हुतात्मा गौरव पुरस्कार, सामाजिक सुरक्षा गौरव पुरस्कार, लोकमंगल गौरव पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, पोलिस मित्र संघटना राज्यस्तरीय पुरस्कार, आदर्श सेवा पुरस्कार, पुणे भुषण प्रेरणा, कला उपासक, अक्कलकोट भुषण पुरस्कार यासारखे असंख्य सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कार मिळाले आहेत.

गणेश जगताप यांनी आतापर्यंतच्या सेवेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना २६५ रिवार्ड मिळाले आहेत. तर बेपत्ता ९२ अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यास मदत केली. तर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत असताना त्यांनी बळजबरीने वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या राज्यातील आणि विदेशातील एकूण ३२४ मुलींची सुटका करण्यास मदत केली. गणेश जगताप यांची उत्कृष्ट कामगिरी व उत्कृष्ट कामाचा आलेख पाहून त्यांची ५ वेळा राष्ट्रपती पदक पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

गणेशभाऊ जगताप यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक – संजय अशोक जगताप (प्रो.प्रा जय गणेश फॅब्रिकेशन), श्री. सुनिल विष्णु पवार व.पो.नि. चाकण पो. स्टे. आणि मित्र परिवार…

आरोग्यविषयक वृत्त