वाढदिवस विशेषांक 

 पोलीसनामा ऑनलाईन 

१ ]  डॉ. बुधाजीराव मुळीक (कृषितज्ञ)

आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर हरितक्रांती व धवलक्रांती झाल्याने  देश हा अन्नधान्य संपन्न व स्वतंत्र झाला. देशाची कृषीप्रधान भारत ओळख निर्माण झाली याचे श्रेय हे काही कृषीतज्ञांना जाते. त्यापैकी एक नाव म्हणजे डॉ. बुधाजीराव मुळीक. शेतीविषयची उच्चपदवी घेतल्यानंतर ’शेती’ हा ध्यास व एक चळवळ हेच त्यांच्या जिवनाचे  उद्दीष्ट्य ठरले .
शेतीमध्ये योग्य तंत्रज्ञानाचा वापर, सुधारित बि-बियाणे व खते यांचा वापर, सेंद्रीय शेती, शेती पूरक जमीन त्याची पत व मातीची चाचणी, योग्य पाण्याचा वापर आणि साठवणूक व इतर अनेक गोष्टींच्या मार्गदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांना  व सरकारला मिळाला आहे.ते शेती व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘भूमाता’ या संस्थेच्या माध्यमातून खेडोपाडी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात .
त्यांनी भूमाता संस्थेच्या माध्यमातून चळवळ सुरु केली शेतीमालाला हमी भाव मिळवण्यासाठी उठाव करून न्याय मिळवून देण्याचा कायम प्रयत्न राहिला आहे. शेतकऱ्यांच्या  पिकास विमा योजना सुरु करण्यासाठी सरकारला आग्रह केला व सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e8b880a-c221-11e8-8a01-994da8f278e8′]

२ ) मुकुल वासनिक (काँग्रेस  नेते)

मुकुल वासनिक  हे महाराष्ट्रातील  काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. २७ सप्टेंबर १९५९ रोजी त्यांचा जन्म दिल्ली मध्ये झाला . अनुभवी कॉंग्रेस नेते आणि तीन वेळा खासदार राहिलेले  बाळकृष्ण वासनिक यांचे ते पुत्र आहेत . त्यांचे शिक्षण हिस्लॉप महाविद्यालय तसेच  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथून झाले आहे.

मुकुल वासनिक १९८४-८६ दरम्यान भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. वयाच्या २५ व्या वर्षी मुकुल वासनिक हे खासदार बनले . कॉंग्रेस आघाडीच्या काळात ते  केंद्रात सामाजिक न्याय मंत्री होते. त्यांचे संघटनात्मक कौशल्य विचारात घेऊन काँग्रेसश्रेष्ठींनी त्यांच्याकडे महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी दिली आहे.ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत.
[amazon_link asins=’B01FM7GGFI,B0756RCTK2,B07DB85QZ3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2b6133ff-c221-11e8-8d99-11f4369aa483′]
३ ) सत्यजीत तांबे  (अध्यक्ष ,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस)
 महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी  सत्यजीत तांबे यांची निवड झाली आहे .
 सत्यजीत तांबे हे काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत.
 त्यांनी  दोन वेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे.
अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती.
गेल्या पंधरा वर्षांपासून एनएसयूआय आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी संघटनबांधणी त्यांनी केली आहे.
अभ्यासू, आक्रमक आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेला काँग्रेसमधील युवानेता अशी त्यांची ओळख आहे.
 या आगोदर दोन वेळा त्यांनी युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपद भूषविले आहे, आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली ते युवक काँग्रेसमध्ये कार्यरत होते.

[amazon_link asins=’B00MIFIKO8,B00MIFIYVM,B00BSE5WQ4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’38a13be1-c221-11e8-8ffe-93acc18dc74c’]

४ )  डॉ . माधव किन्हाळकर (माजी राज्यमंत्री)
एकेकाळी राष्टवादी काँग्रेस पक्षात असणारे माधव किन्हाळकर यांनी २०१४ मध्ये  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आहे. २७ सप्टेंबर १९५७  रोजी त्यांचा जन्म झाला .
महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीत  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पेड न्यूज दिल्याची तक्रार त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. माधव किन्हाळकर यांनी केली होती. चव्हाण यांच्यावर चालत असलेला पेड न्यूज खटला प्रकरणी केंद्रीय निवडणुक आयोगाने त्यांच्याविरोधात आरोप निश्चित केले होते या गोष्टींचा नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसला होता .